शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी मुंबई :   नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दि. २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होत आहे. सध्या हे विमानतळ केवळ भव्य टर्मिनल, धावपट्ट्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच नव्हे, तर जागतिक स्तरावर मान्य असलेल्या ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ORAT) या व्यापक तयारी प्रक्रियेमुळे चर्चेत आहे. 

विमानतळ प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया आणि मनुष्यबळाची प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याची शिस्तबद्ध प्रक्रिया म्हणजेच ओआरएटी होय.  विमानतळ सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 

प्रत्येक स्तरावर प्रशिक्षणनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालन प्रक्रियेत यासंबंधीच्या घटकांचा समन्वय साधण्यात आला आहे. विमान कंपन्या, सीआयएसएफ, हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी), ग्राउंड हँडलिंग एजन्सी, आपत्कालीन सेवा, व्यापारी आस्थापना आणि विमानतळ कर्मचारी आदी घटकांची यात  भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. नवीन टर्मिनल लेआउट, प्रवासी प्रवाह, स्वयंचलित प्रणाली आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांचे प्रशिक्षण प्रत्येक स्तरावर देण्यात आले आहे. 

लाइव्ह ऑपरेशनल ट्रायल्सओआरएटीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘लाइव्ह ऑपरेशनल ट्रायल्स’. या टप्प्यात स्वयंसेवक प्रवाशांच्या भूमिकेतून चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग, बॅगेज हँडलिंग आणि आपत्कालीन परिस्थितींची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. हरवलेली कागदपत्रे, जादा सामान, सहकार्याची गरज असलेले प्रवासी, सुरक्षा तपासणीदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन अशा रोजच्या आव्हानांची जाणीवपूर्वक निर्मिती करून यंत्रणा तपासण्यात आली. तंत्रज्ञानाच्या पातळीवरही काटेकोर चाचण्या घेण्यात आल्या. डिजिटल चेक-इन, रिअल-टाइम मॉनिटरिंग, एकात्मिक सुरक्षा प्रणाली आणि बॅगेज सिस्टीम यांचा ताणतणावात कार्यक्षमतेने प्रतिसाद तपासण्यात आला. या सर्व प्रक्रियेचा थेट लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Ready for Take-Off; Flights Start December 25

Web Summary : Navi Mumbai International Airport will open for commercial flights on December 25. Extensive ORAT testing ensures smooth operations from day one. The airport has trained staff and tested systems, including live simulations with volunteers, to manage passenger flow and security effectively. Passengers will directly benefit from rigorous readiness checks.
टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई