शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाच्या रडारला मिळाला ग्रीन सिग्नल; धाकले आयलंडवर यंत्रणा बसविण्यास केंद्राची अटी व शर्तींवर परवागनी

By नारायण जाधव | Updated: February 20, 2024 09:01 IST

कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे.

नारायण जाधव

नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने या विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली बेलापूर शहाबाज जवळील पनवेल खाडीतील धाकले आयलंडवर निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यास केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही अटी व शर्तींवर परवागनी दिली आहे.

यानुसार यात बाधित होणाऱ्या खारफुटीचे नुकसान कमी करण्यासाठी रडार यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेला पुलांच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये दोन खांबांचे अंतर २० मीटरवरून ३० मीटरपर्यंत वाढविण्याची सूचना केंद्राने केली आहे. तसेच विजेच्या बचतीसाठी  रडार प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत.  

बिल्डरांसाठी धाकले आयलंडची निवड

            सिडकोनेे पूर्वी एनआरआय कॉम्प्लेक्स मागील जागेची निवड केली होती. मात्र, यामुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर बंधने होती.

            बिल्डरांच्या अंदाजे तीन हजार कोटींचे प्रकल्प अडचणीत आले होते. यामुळे त्यांच्या संघटनेने सिडकाेकडे रडारची जागा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

            सिडकोची १७० हेक्टर विक्रीयोग्य जमीन धोक्यात येणार होती. हे टाळण्यासाठी धाकले आयलंडची निवड केली आहे.

वाहतुकीसाठी सोयीची जागा

धाकले आयलंड हे आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेट्टी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.

प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवाशांची हाेणार ये-जा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे.

त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ ठिकाणी विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे.