शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई  विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव, पनवेल महापालिकेत प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 04:36 IST

प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे नेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने शुक्रवारी महासभेत ठराव करून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपमहापौर चारुशीला घरत यांनी हा ठराव सभागृहासमोर मांडल्यानंतर नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या ठरावाला अनुमोदन दिल्यानंतर त्वरित हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. हा ठराव सिडकोसोबत चर्चा केल्यानंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आयुक्तांनी महासभेत स्पष्ट केले.हा ठराव घेण्यासंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर, कुसुम म्हात्रे, अरु ण भगत, दर्शना भोईर, अमर पाटील यांनी प्रस्ताव सूचना केली होती. नुकतेच सिडको व एमआयडीसी प्रकल्पग्रस्त कृती समितीने विमानतळाच्या साईटवर जाऊन विमानतळाला दिबांचे नाव दिले. औपचारिकरीत्या केलेल्या या नामकरण सोहळ्यावेळी दिबांच्या नावाचे फलक देखील याठिकाणी लावण्यात आले.अतिवृष्टीमुळे नागझरी गावात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. ११ ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले असून या ग्रामस्थांना मदत देण्याची मागणी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली. २९ गावांच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाच्या ठरावाला देखील मंजुरी देण्यात आली. स्थायी समितीमध्ये नवीन सदस्यांची निवड, पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पालिकेमार्फत तयार केलेल्या डीपीआरला यावेळी मंजुरी, अमृत योजनेअंतर्गत पालिकेचे बुडालेले २०० कोटी या विषयांवर महासभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.कचरा व्यवस्थापनाकरिता इंदूर पॅटर्नपालिका क्षेत्रात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. त्यामळे इंदूर शहरात ज्या प्रकारे कचऱ्याचे नियोजन केले जाते, तोच पॅटर्न पनवेल महानगर पालिका क्षेत्रात राबवावा, अशी मागणी नगरसेविका लीना गरड यांनी केली.अमृत योजनेचे २०० कोटी गेले कुठे ?पनवेल महानगर पालिकेला अमृत योजनेंतर्गत मिळणाºया २०० कोटींचे काय झाले ? असा प्रश्न नगरसेवक हरेश केणी व नितीन पाटील यांनी उपस्थित केला. मात्र योग्य पाठपुरावा झाला नसल्याने पालिकेला निधी मिळाला नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. याकरिता नव्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.२९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळासिडकोची स्थापना होऊन तब्बल ४० वर्षांचा कालावधी लोटून देखील अनेक गावांचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. पनवेल तालुक्यातील२९ गावांचा समावेश आहे. पनवेल महानगर पालिकेत असल्याने या गावांच्या सिटी सर्व्हेला महासभेने मंजुरी दिली असल्याने सर्व्हेनंतर सिडको व पालिकेचा हद्दीचा वाद संपणार असून गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सर्र्व्हेेकरिता पालिका १ कोटी ९० लाख रु पये भूमी अभिलेख विभागाला देणार आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगर पालिकेने अद्याप पालिकेतील गावांचा सर्व्हे केला नाही.मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती केली गेली. याकरिता हजारो शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली. मात्र शेतकºयांच्या जमिनी कवडीमोल भावात विकत घेणाºया सिडकोविरोधात दि.बा. पाटील यांनी यशस्वी लढा दिला. देशाला साडेबारा टक्केचा नवा कायदा दिला. तसेच स्थानिकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा अधिकार दिल्याने अशा नेत्याच्या त्यागाची दखल घेण्यासाठी विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव द्यावे म्हणून हा ठराव करण्यात आला.- परेश ठाकूर,सभागृह नेते, पनवेल महापालिकानवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबांच्या नावाचा आग्रह आम्ही यापूर्वी धरला होता. म्हणूनच आम्ही त्वरित या ठरावाला मंजुरी दिली आहे. पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना देखील अशाप्रकारचा ठराव झाला होता. सत्ताधाºयांनी याकरिता शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे गरजेचे आहे.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिकानवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात ठरावाला महासभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. हा ठराव सिडकोसह राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ