शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईची ‘मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम’कडे भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:15 IST

आजपासून व्यावसायिक उड्डाणे; मुंबईच्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवार, २५ डिसेंबरपासून व्यावसायिक विमानसेवांसाठी खुले होत आहे. यामुळे मुंबईच्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी करण्यासोबतच शहराला ‘मल्टी-एअरपोर्ट सिस्टीम’कडे नेणारा असल्याचे अदानी समूहाने बुधवारी स्पष्ट केले. 

गेल्या दशकभरापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढलेली प्रवासी व विमानांची गर्दी ही मोठी समस्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील हे नवे हवाई प्रवेशद्वार मुंबई, नवी मुंबई, पनवेलसह संपूर्ण ‘एमएमआर’ परिसरासाठी दिलासादायक ठरणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. 

२०२१ पासून अदानी समूहाच्या माध्यमातून अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लिमिटेडने या प्रकल्पाचा विकास, बांधकाम आणि ऑपरेशनल तयारी वेगाने पूर्ण केली आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा आहे. 

येत्या फेब्रुवारीपासून २४ तास सेवेला प्रारंभपहिल्याच दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर आणि स्टार  एअर या विमान कंपन्यांच्या देशांतर्गत सेवा सुरू होतील. एकूण ९ शहरांशी संपर्क साधणाऱ्या १५ नियोजित उड्डाणांची हाताळणी पहिल्या दिवशी होणार आहे. प्रारंभी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विमानतळ कार्यरत राहणार असून, दररोज २४ उड्डाणे आणि ताशी १० विमान हालचालींची क्षमता असेल. फेब्रुवारी २०२६ पासून टप्प्याटप्प्याने २४ तास सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

आर्थिक विकासाला बळप्रारंभी २० दशलक्ष प्रवाशांची वार्षिक क्षमता असलेल्या या विमानतळाची भविष्यात ९० दशलक्ष प्रवाशांपर्यंत विस्तारण्याची योजना आहे. तसेच कार्गो टर्मिनल आणि बहुविध वाहतूक जोडणीमुळे हा विमानतळ मुंबईच्या आर्थिक विकासाला नवे बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

समारंभाविनाच विमानांचे उड्डाणनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे समाधान आहे. गुरुवारपासून हे विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले होत आहे. मात्र, सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कोणत्याही समारंभाशिवाय त्याचा व्यावसायिक वापर सुरू करणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी स्पष्ट केले.पहिल्या दिवशी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांची विमाने उड्डाण घेणार आहेत. येथे सकाळी ८ वाजता ६ई ४६० (बंगळुरू) या विमानाचे आगमन होईल. त्यानंतर ६ई ८८२ (हैदराबाद) हे विमान सकाळी ८:४० वाजता उड्डाण घेईल. १५ जानेवारीपर्यंत दिवसाला सुमारे ४८ विमानांचे लॅण्डिंग आणि टेकऑफ हाेईल, असे सिंघल यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Propels Mumbai Towards Multi-Airport System

Web Summary : Navi Mumbai International Airport opens December 25th, easing Mumbai's air traffic. The airport will initially handle 15 daily flights to 9 cities. A 24-hour service will begin in February 2026. It aims for 90 million annual passengers, boosting economic growth.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ