शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाचे काउंटडाउन सुरू; नामकरणाचे काय? कृती समिती मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 09:15 IST

सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळारून पुढील महिनाभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीबरोबरही करार केला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न रेंगाळला आहे. विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन केली आहे. समितीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत अनेक आंदोलने केली. विशेष म्हणजे या मागणीला अनुकूलता दर्शवत शासनाने विधानसभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

केंद्राकडे सतत पाठपुरावा

सध्या विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. पुढील महिनाभरात विमानतळाचे उद्घाटन करण्याची योजना आहे. त्यादृष्टीने अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीने इंडिगो कंपनीबरोबर हा करार केला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असल्याने प्रकल्पग्रस्तांत अस्वस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सर्वपक्षीय समितीने लावून धरली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला उद्घाटनापूर्वी शिक्कामोर्तब करावे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी आग्रह धरला जाणार आहे.-डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळChief Ministerमुख्यमंत्री