शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या विज्ञान प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड

By योगेश पिंगळे | Updated: February 14, 2024 16:04 IST

आयुक्तांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

योगेश पिंगळे,नवी मुंबई : नुकत्याच ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत विज्ञान प्रकल्प स्पर्धेमध्ये ३६ जिल्हयांतील ४५ हजारहून अधिक विदयार्थी प्रकल्पाची नोंदणी झाली होती. त्यामधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली असून त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गोठीवली येथील शाळा क्रमांक ४६  मधील प्रिती राठोड व पल्लवी सोळंके या दोन विदयार्थिनींनी साकारलेल्या अभिनव प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल या दोन्ही विदयार्थिनींचा महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गुणसंपन्न विदयार्थी घडविण्यासोबतच त्यांच्यातील अंगभूत गुणांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्व विकासावरही भर दिला जात आहे. या अनुषंगाने विविध कला, क्रीडा प्रकारांप्रमाणेच विज्ञान प्रकल्प स्पर्धांमध्येही महापालिका शाळांतील विदयार्थी कामगिरी करत आहेत. या दोन विदयार्थिनींनी तयार केलेल्या प्रकल्पाची तालुका पातळीवरुन जिल्हा पातळीवर व पुढे जिल्हा पातळीवरुन राज्य पातळीवर आणि त्यापुढे राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. त्याचप्रमाणे गोठीवली शाळेतीलच अंश शर्मा व विलास गुरव या दोन विदयार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बहुउपयोगी खुर्ची’ या प्रकल्पाची महापालिका स्तरावर महापालिका स्तरावर उत्त्म प्रकल्प म्हणून निवड झालेली आहे. त्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

रायफल शुटींगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थिनींचाही सन्माननवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने विविध खेळांत नैपुण्य असणा-या महापालिका शाळेतील विदयार्थ्यांना उत्त्म दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण उपलब्ध्‍ करुन दिले जात आहे. यामधील रायफल शुटींग या ऑलिपिंक स्तरावरील मान्यताप्राप्त खेळाच्या प्रशिक्षण सुविधा केंद्रातून प्रशिक्षण घेऊन राज्यस्तरावर प्राविण्य प्राप्त करणा-या नुतन चौधरी व अंशिका प्रजापती या दोन महापालिका शाळेतील विदयार्थिनींना त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व्यासपीठावर उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMuncipal Corporationनगर पालिकाSchoolशाळा