शशिकांत मोरे, धाटावकोकणच्या विकासाचा महामार्ग म्हणून नावारूपाला येणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर मात्र दिवसागणिक होत असलेल्या विचित्र अपघातांमुळे हा मार्ग रहदारीला आता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवासीवर्गालाही जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा अडथळा निर्माण होत असून यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी होत आहे. सध्या उन्हाळी सुटी आणि लग्नसराई तसेच कोकणात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी वर्दळ या महामार्गावर पहावयास मिळत आहे.मुंबईतील चाकरमानी वर्गाला कोकणात जाण्याकरिता मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे सोयीचा मार्ग. त्यातच पळस्पे ते इंदापूर रस्त्याच्या रु ंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असल्याने ठिकठिकाणी रस्त्यालगत विखुरलेले बांधकाम साहित्य, अडथळा ठरत असलेले डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यालगत असणारे मातीचे ढिगारे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. काही ठिकाणी वळविण्यात आलेल्या वाहतूक मार्गावर ठेकेदारांकडून डायर्व्हसनच्या बोर्डचा अभाव आदी कारणामुळे वेगवान वाहनांना एकाकी वेगावर नियंत्रण मिळविणे अवघड होताना दिसत आहे. > मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात झाल्यास उपलब्ध असलेल्या एका रु ग्णवाहिकेने प्राथमिक आरोग्य केंद्रात रु ग्णाला उपचाराकरिता आणले जाते, मात्र ही रु ग्णवाहिका इतर ठिकाणी असल्यास एखाद्या मयत व्यक्तीस ११ कि.मी. रोह्यातील रु ग्णालयात शवविच्छेदनासाठी घेऊन जाताना अडचण निर्माण होते.- एम. डी. पाटील, पोलीस हवालदार, कोलाड वाहतूक पोलीस
राष्ट्रीय महामार्ग धोकादायक !
By admin | Updated: April 20, 2016 02:33 IST