शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

फायनान्सवरील दरोड्याप्रकरणी नाडार टोळीतील दोघांना अटक, गतवर्षातील घटना : ४४ लाख ६३ हजारांचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 2:54 AM

सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा टाकणा-या टोळीतील इतर दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे लुटीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

नवी मुंबई : सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा टाकणा-या टोळीतील इतर दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे लुटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीच अटकेत असलेल्या अर्पुतराज नाडार याने लपवलेले दागिने शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.सीवूड येथील पॉप्युलर फायनान्स कंपनीवर दरोडा पडल्याची घटना ६ आॅगस्ट २०१६ रोजी घडली होती. या दरोड्यामध्ये त्या ठिकाणचे सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी तपासात हा दरोडा नाडर टोळीने टाकल्याचे निष्पन्न झाले होते. या टोळीने यापूर्वीही देशभरात अनेक ठिकाणी ज्वेलर्सवर दरोडे टाकलेले असल्याने सर्वच ठिकाणचे पोलीस त्यांच्या शोधात होते. अखेर मुंबई पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे काही जणांना अटक करून नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याकडून अधिक चौकशीत गुन्हे शाखा पोलिसांंनी नाडार टोळीचा म्होरक्या अर्पुतराज नाडार याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना अटक करून एकूण ५२ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. शिवाय सहाही जणांविरोधात संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल झालेले आहे. अशातच गतमहिन्यात गुन्हे मध्यवर्ती शाखेचे सहायक उपनिरीक्षक संजय पवार यांना नाडर टोळीच्या पाहिजे असलेल्या सदस्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सह आयुक्त नितीन कौसडीकर, वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक योगेश देशमुख, अमित शेलार, हवालदार संजय पवार, पोपट पावरा, सतीश सरफरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी धारावी येथे सापळा रचून पोन्नुस्वामी तंगास्वामी नाडार याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यापूर्वीच अटकेत असलेला टोळीचा म्होरक्या अर्पुतराज नाडार याने लपवलेल्या दागिन्यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार धारावी येथील मुत्तूकुमार नाडार याच्या घरी छापा टाकून ४४ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्ह्यातील मालाची विल्हेवाट लावण्यात सहकार्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, नाडार टोळीच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.