शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

माझा कचरा माझी जबाबदारी अभियान सुरू; चळवळीमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 2:03 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचाच भाग म्हणून, ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अभियानही राबविले जात आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला चळवळीचे स्वरूप देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याचाच भाग म्हणून, ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ अभियानही राबविले जात आहे. गतवर्षी देशात आठव्या क्रमांकावर असणाºया नवी मुंबईला यावर्षी प्रथम क्रमांकच मिळाला पाहिजे, असा निर्धार पालिकेने केला असून या चळवळीमध्ये नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.स्वच्छ सर्वेक्षणाविषयी माहिती देण्यासाठी महापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी महापालिका राबविणार असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील गावगावठाण परिसर, झोपडपट्टी वसाहतींमध्येही नागरिकांना स्वच्छतेचे विशेष धडे देण्यात आले असून, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. पहाटेपासून शहराच्या प्रत्येक विभागामध्ये स्वच्छता अधिकारी, सफाई कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी हे प्रत्येक विभागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत आहेत. सकाळी तसेच रात्रीच्या वेळीदेखील सफाईचे काम सुरू आहे. स्वच्छतेच्या या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सोसायट्या, शाळा- महाविद्यालये, रु ग्णालये व प्रभाग पातळीवरही स्वच्छतेविषयी निकोप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून, विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. ‘मागील वर्षी ४३४ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली होती. या वर्षी ४०१४१ शहरांनी सहभाग घेतला आहे, तरीही देशात पहिला क्र मांक मिळविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.स्वच्छ सर्वेक्षण २०१७मध्ये नागिरकांचा प्रतिसाद ३० टक्के, संबंधित कागदपत्रे ४५ टक्के आणि प्रत्यक्ष निरीक्षण २५ टक्के इतके होते. यंदा मात्र नागरिकांचा सहभाग ३५ टक्के, संबंधित कागदपत्रे ३५ टक्के आणि प्रत्यक्ष निरीक्षण ३० टक्के इतके आहे. यामध्ये लोकसहभागाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तर संबंधित कागदपत्रांना कमी महत्त्व देण्यात आले आहे.विभागनिहाय पुरस्कार प्राप्त गृहनिर्माण सोसायट्याबेलापूर विभाग : प्रथम क्रमांक निलगिरी गार्डन को.आॅप सोसायटी सेक्टर २४, द्वितीय सीवूड इस्टेट, तृतीय कोकण रेल विहार सीवूडनेरुळ विभाग : पामबीच रेसिडेन्सी, एसबीआय कॉलनी, आर्मी को.आॅप सोसायटी, वाशी विभागात नेपच्यून सोसायटी, न्यू सूर्योदय सोसायटी, शांतीसागर सोसायटीतुर्भे विभाग : साई प्राइड को.आॅप सोसायटी सानपाडा, मिलीनिअम टॉवर बी टाइप सानपाडा, पॅराडाइड को.आॅप सोसायटीकोपरखैरणे विभाग : ब्रेवर्ली पार्क, कलश उद्यान, फाम सोसायटीघणसोली विभाग : त्रिशूळ गोल्ड कॉस्ट सोसायटी, भूमी पार्थ सहकारी गृहनिर्माण संस्था, आदर्श सोसायटीऐरोली विभाग : मरक्युरी सोसायटी, नेव्हा गार्डन सोसायटी, ब्रिज व्ह्यूव सोसायटीशहरस्तरावरील विजेत्या गृहनिर्माण सोसायट्यापामबीच रेसिडेन्सी, नेरूळ; निलगिरी गार्डन को .आॅ. हौ. सोसायटी सेक्टर २४ बेलापूर; ब्रेवर्ली पार्क, सेक्टर १४ कोपरखैरणेविभागनिहाय स्वच्छ शाळा, कॉलेजबेलापूर - दिल्ली पब्लिक स्कूल,एस. एस. हायस्कूलनेरुळ - डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी,एपीजे स्कूलवाशी - कर्मवीर भाऊराव पाटील,गोल्ड क्रीस्ट शाळातुर्भे - साधू वासवाणी इंटरनॅशनल स्कूल,अ‍ॅवलोन हाय इंटर स्कूलकोपरखैरणे - रा. फ. नाईक, ज्ञानविकास शाळाऐरोली - ज्ञानदीप विद्यालयशहरस्तरावरील स्वच्छ शाळा, कॉलेजवाशी - कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजतुर्भे - साधू वासवाणी इंटरनॅशनल स्कूल सानपाडाविभागस्तरावर महापालिकाशाळांची केलेली निवडबेलापूर - शाळा क्रमांक ४, शाळा क्रमांक २नेरुळ - शाळा क्रमांक १०२,कुकशेत शाळा क्रमांक ०९वाशी - शाळा क्रमाक २८, शाळा क्रमांक २९तुर्भे - शाळा क्रमांक १८, शाळा क्रमांक २२कोपरखैरणे - महापालिका शाळा ४१,शाळा क्रमांक ३६घणसोली - शाळा क्रमांक ५५,शाळा क्रमांक ७६,१०५ऐरोली - शाळा क्रमांक ४८, शाळा क्रमांक १०३दिघा - शाळा क्रमांक १०८, शाळा क्रमांक ५२महापालिकास्तरावर निवडण्यात आलेल्या दोन शाळाघणसोली - शााळा क्रमांक ५५तुर्भे - शाळा क्रमांक १८स्वच्छ मार्केट स्पर्धानेरुळ - फकिरा मार्केटवाशी - महाराजा मार्केटस्वच्छ हॉस्पिटल स्पर्धानेरुळ -डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलबेलापूर - अपोलो हॉस्पिटलस्वच्छ हॉटेल स्पर्धासरोवर हॉटेल, महापेरामदा हॉटेल, कोपरखैरणेस्वच्छ प्रसाधनगृह स्पर्धाशारकर आळी,रबाळे, समतानगर, ऐरोलीस्वच्छ प्रभागवाशी - प्रभाग ६३बेलापूर - प्रभाग १०४कोपरखैरणे - ५२स्वच्छ उद्यान स्पर्धाबेलापूर - संत गाडगेबाबा स्मृती उपवन(रॉक गार्डन)ऐरोली - चिंचोली उद्यान सेक्टर ५ ऐरोलीगावठाण परिसरावरही लक्ष केंद्रितग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याने पालिकेला मागील सर्वेक्षणात कमी गुण मिळाले होते. यंदा गावात स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून, मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी आराखडा तयार करून गावातील मलनि:सारण वाहिन्यांवर सांडपाणी प्रक्रि या केंद्र उभारण्यात आली. कचरा वर्गीकरणासाठी गावगावठाण, झोपडपट्टी परिसरात स्वच्छता अधिकाºयांकडून वेळोवेळी पाहणी केली जात आहे. कचरा वर्गीकरणाचे या भागातील प्रमाण वाढविण्यात प्रशासनाला अपेक्षित यश मिळत असून, येत्या काही दिवसांत परिसरामधील स्वच्छतेचे प्रमाण आणखी वाढणार आहे.शहरातील १७ हजार शौचालयांना अनुदान देण्यात आले आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून विविध पातळीवर उपक्रम राबवित नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.- जयवंत सुतार,महापौर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई