शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

पालिका देणार जानेवारीमध्ये शैक्षणिक साहित्य

By admin | Updated: November 9, 2016 04:07 IST

महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षामध्येच शैक्षणीक साहित्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

नवी मुंबई : महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन वर्षामध्येच शैक्षणीक साहित्य मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासकिय दिरंगाईमुळे गणवेश व इतर साहित्य खरेदी करण्यास विलंब झाल्याचा ठपका नगरसेवकांनी ठेवला असून स्थायी समितीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात सर्व महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असताना नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील उपस्थिती प्रत्येक वर्षी वाढत आहे. पालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, दफ्तर, वह्या, पी.टी. गणवेश, बुट, मोजे असे जवळपास १२ प्रकारचे साहित्य मोफत पुरविण्यात येते. शाळा सुरू झाली की तत्काळ शैक्षणीक साहित्य देता यावे यासाठी फेब्रुवारी व मार्च महिन्यापासून निवीदा प्रक्रियेला सुरवात केली जाते. पण २०१६ - १७ या शैक्षणीक वर्षातील साहित्य खरेदीचे दर जास्त असल्याचे कारण देवून ठेका रद्द करण्यात आला होता. यानंतर निवीदा प्रक्रिया पुर्ण करण्यास विलंब झाल्याने जुनमध्ये साहित्य देण्यात अपयश आले. रखडलेली गणवेश खरेदी करण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण करून दोन वर्षातील साहित्य खरेदीसाठी १५ कोटी २५ लाख रूपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. पुढील ४५ दिवसामध्ये प्रत्यक्ष साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे २०१६ वर्षासाठीचे शैक्षणीक साहित्य जानेवारी २०१७ मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीमधील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या दिरंगाईविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. शैक्षणीक साहित्याचे नमुणे पाहण्यासाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात यावेत. यापुर्वी एक ठेकेदारास काम दिले व बिले दुसऱ्याच्या नावाने देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. दुसऱ्याच्या नावाने बिले कशी अदा केली याविषयी प्रशासनाने जाब विचारला. प्रशासन त्यांच्या सोयीप्रमाणे निवीदेमधील अटी शर्ती तयार करत असून सोयीप्रमाणे बदलत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच विद्यार्थ्यांचे नुकसाण झाले असून त्याचे खापर स्थायी समितीवर फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते जयवंत सुतार, सभापती शिवराम पाटील, एम. के. मढवी, मिरा पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीने यापुर्वी हा प्रस्ताव स्थगीत करून खुलासा मागीतला होता. शैक्षणीक साहित्याचे नमुणे दाखविण्याचे आदेश दिले होते. पण या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)