शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

महापालिकेचे ‘मिशन इंद्रधनुष्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:34 IST

बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले

नवी मुंबई : बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून २,७१,६६८ घरांमध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच ८६ बाह्यसत्र आणि ३ मोबाइल, असे एकूण ८९ विशेष मिशन इंद्रधनुष्यची सत्रे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या ३५५६ मुले व ८३१ गरोदर माता अशा एकंदर ४३८७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके, ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यास्तव या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती स्थापन केली असून, सदर मोहिमेमध्ये दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता ज्यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असलेल्या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही, अथवा लसीकरण न घेतलेल्या बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लस, सर्व तयारी करण्यात आली असून, जनतेमध्ये जनजागृतीकरिता भित्तीपत्रके, हस्तपत्रके, बॅनर, पताका, होर्डिंगच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थीला दिवाळीच्या शुभेच्छांसहित लसीकरणाची आठवण करून देण्याकरिता भेटकार्ड दिले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, संघटना, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, बालरोगतज्ज्ञ, सार्वजनिक मंडळे, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांनी सदर राष्ट्रीय अभियानाअंतर्गत बालके आणि गरोदर माता यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे व ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका