शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेनेच उडवला स्वच्छतेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 02:01 IST

तोडलेले झाड पडून : डेब्रिजचे ढिगारेही उचलण्यास दिरंगाई

कळंबोली : पनवेल बसस्थानकासमोरील अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टीतील गाळ्यावर महापालिकेने आठवडाभरापूर्वी हातोडा मारला. या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पत्राही लावण्यात आला. मात्र, कारवाईदरम्यान येथील ४० वर्षे जुने झाड तोडण्यात आले. त्याच्या फांद्या अद्याप उचलण्यात आलेल्या नाहीत. पावसामुळे पालापाचोळा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

बसस्थानका समोरील झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळ्यांवर महापालिका आयुक्तांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने २९ मे राजी कारवाई केली. अतिक्रमण तोडल्याने रस्ता रुंद झाला आहे. मात्र, कारवाई दरम्यान ४० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड तोडण्यात आले आहे. तोडलेले झाड बसस्थानक शेजारी सुशोभीकरण करण्यात आलेल्या जागेवर टाकण्यात आले आहे. १५ दिवस झाले तरी तोडलेले झाड उचलण्याचे काम महापालिकेने केले नाही, त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला आहे. ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ असा संदेश लिहिलेल्या जागेवरच झाडांच्या फांद्या व सुकलेली पाने पडली आहेत. सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे पालापाचोळा कुजल्याने दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे महापालिका महास्वच्छता अभियान राबवते आहे आणि दुसरीकडे अशाप्रकारे स्वच्छतेचा बोजवारा स्वत:च उडवते आहे. लवकरात लवकर या ठिकाणची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.डेब्रिजही जैसे थेच्शिवाजीनगर येथील झोपडपट्टीमधील व्यावसायिक गाळेही महापालिकेने तोडले; पण त्याचे डेब्रिज तेथेच पडून आहे.च्कारवाईला १५ दिवस उलटले तरी महानगरपालिकेने डेब्रिजचे ढीग उचलण्यास दिरंगाई केली आहे. याकडेही महापालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईGarbage Disposal Issueकचरा प्रश्न