शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम : ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 12:19 IST

मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कारणास्तव तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. हा रस्ता बंद असल्यानं ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.

नवी मुंबई - मुंब्रा बायपास दुरुस्तीच्या कारणास्तव तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. हा रस्ता बंद असल्यानं ठाणे आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे.  बुधवारीदेखील (9 मे) सकाळच्या सुमारास ठाणे-बेलापूर रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.  घणसोली रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास 5 ते 6 किमी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंब्रा बायपास बंद झाल्याने शिळफाटा-महापे-घणसोली-ऐरोली-ठाणे या पर्यायी मार्गाचा वापर प्रवाशांना करावा लागत आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्तापदेखील सहन करावा लागत आहे.

दरम्यान, हा रस्ता मुख्यत: जेएनपीटीकडून येणा-या आणि जाणा-या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठीदेखील चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक याचा वापर करतात. या सर्वांना दोन महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गांवरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे सात किलोमीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाड्यांना सोडण्यात येत असून त्यांना विशेष मार्किंग केले जात आहे. याशिवाय, जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणा-या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे. ठाणे आणि नवी मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल, यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.

(मुंब्रा बायपास मंगळवारपासून दोन महिने बंद)एकच टोल भरावा लागणार - पालकमंत्रीमुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक दोन टोल भरण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून वाहनचालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यांपैकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा, अशा सूचना दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.२४ तास काम राहणार सुरूमुंब्रा बायपासच्या कामाला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून ते पूर्ण करण्यासाठी २४ तास काम करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे आणि बेअरिंगचे काम करण्यात येणार आहे पावसापूर्वी हे काम संपवावे, अशा सूचना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.300 पेक्षा अधिक फौजफाटा तैनातया कामाच्या दरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांसह वॉर्डन अशी तीनशेपेक्षा अधिक जणांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. गरज भरल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.

पर्यायी मार्गजेएनपीटीकडून - नवी मुंबईकडून नाशिक दिशेने जाणा-या जड आणि अवजड वाहनांसाठी जेएनपीटी पॉइंट, पळस्पा, डावीकडे वळण घेऊन जुन्या मुंबई रोडने चौकगाव, चौकफाटा, त्यानंतर डावीकडे वळण घेऊन कर्जत, मुरबाड, डावीकडे वळण घेऊन सरळगाव, डावीकडे वळण घेऊन किन्हवलीमार्गे शहापूरवरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून नाशिक किंवा नाशिकच्या दिशेने इच्छितमार्गे जाऊ शकतात, ही वाहतूक २४ तासांसाठी खुली राहणार आहे .

जेएनपीटी-नवी मुंबई येथून भिवंडीकडे जाणारी अवजड वाहने रात्री ११ ते ५ या कालावधीत जेएनपीटी, कळंबोली सर्कल, तळोजा, कल्याणफाटा याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन कल्याण शीळ रोडने काटई, पत्रीपूल, कल्याण दुर्गाडी सर्कल पूल, कोनगाव, रांजनोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून भिवंडीकडे जाता येणार आहे.

नवी मुंबईकडून उरणफाटामार्गे महापे सर्कलकडून शीळफाटामार्गे गुजरातकडे जाणा-या वाहनांना उजवीकडे वळण घेऊन शीळफाट्याकडे येण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत महापे सर्कल येथून डावीकडे वळण घेऊन हॉटेल्स पोर्टिका सरोवरसमोरून उजवे वळण घेऊन रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळेनाका, ऐरोली पटनी सर्कल, डावीकडे वळून ऐरोली सर्कल, उजवीकडे वळण घेऊन मुलुंड, ऐरोली पुलावरून ऐरोली टोलनाकामार्गे उजवीकडे वळण घेऊन पूर्वद्रुतगती मार्ग मूलुंड आनंदनगर टोलनाक्यावरून घोडबंदर रोडने गुजरातच्या दिशेने जातील.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८ - अहमदाबाद गुजरातकडून जेएनपीटी नवी मुंबईकडे व पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाºया अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास वापरणे २४ तासांसाठी बंदी घातली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई