शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

मुंबईचे वातावरण अत्यंत खराब, ‘सफर’च्या नोंदीनुसार दिल्लीनंतर दुसरा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 04:33 IST

‘सफर’च्या नोंदीनुसार दिल्लीनंतर दुसरा क्रमांक : अंधेरी, मालाड, बीकेसीत कमालीची नोंद

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना कमालीचा गारठा अनुभवास येत असतानाच, दुसरीकडे मात्र मुंबईचे आरोग्य बिघडले आहे. मुंबईच्या वातावरणात धूर, धुके, धूळ यांचे प्रमाण वाढत असून, याच्या मिश्रणामुळे निर्माण होत असलेल्या धूरक्याने मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरावर कमालीच्या धूरक्याची नोंद झाली असून, या प्रदूषणाबाबत दिल्ली खालोखाल मुंबईचा क्रमांक आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात वाहत असलेली वाहने, सुरू असलेली बांधकामे यांचा हा परिणाम आहे. वाहनांच्या धुरामुळे मुंबईचे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. ‘सफर’च्या शुक्रवारच्या नोंदीनुसार, अंधेरी, मालाड, बीकेसी आणि माझगाव या परिसरात कमालीच्या प्रदूषणाची नोंद झाली आहे. पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात आणि मुंबई शहरात अधिक प्रदूषण नोंदविण्यात येत आहे.येथील हवामानाचा विचार करता, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ७.६ अंश नोंदविण्यात आले आहे.मुंबईच्या हवेचादर्जा घसरलापरिसर हवेचीगुणवत्ताअंधेरी ३९२मालाड ३७८बीकेसी ३६६माझगाव ३२१चेंबूर २५६कुलाबा २४५वरळी २४४भांडुप २२४बोरीवली १९७(पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)मुंबई शहराचा विचार करता समुद्र किनाऱ्यावरील वातावरण अदृश्य स्वरूपाचे नोंदविण्यात आले. मरिन लाइन्स, रे रोड, वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ येथील वातावरणात कमालीचे धुरके निदर्शनास आले. अंधेरीसह मालाडचा विचार करता, मुंबई शहराच्या तुलनेत पश्चिम उपनगरातील धूरक्याचे प्रमाण तुलनेने अधिक नोंदविण्यात आले. येथील वातावरणात अधिकचे धूरके असून, येथील वातावरणही अदृश्य स्वरूपाचे नोंदविण्यात आले.शहर हवेचीगुणवत्तादिल्ली ३६९मुंबई २८५अहमदाबाद २१९पुणे १२८(पार्टीक्युलेट मॅटरमध्ये)मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता, ५ जानेवारी रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १६ अंशाच्या आसपास राहील. ६ जानेवारी रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील.

टॅग्स :Mumbaiमुंबई