शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील पोलीस शिपायाचा सुपारी देऊन खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 06:40 IST

महिला पोलिसासह दोघांना अटक : पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर घडविला होता अपघात

ठळक मुद्देया प्रकरणी सानपबरोबर मुंबई पोलीस दलात काम करणारी शीतल पानसरे व इतर दोन जणांना अटक केली. शीतल व सानप यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असलेल्या शिवाजी सानप याला १५ ऑगस्टला पनवेल रेल्वे स्टेशनबाहेर कारने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे निदर्शनास आले आहे. महिला पोलिसाने पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन हा अपघात घडविल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी एकूण तिघांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मुंबईतील पोलीस शिपाई शीतल पानसरेसह उलवेत राहणारे विशाल जाधव व गणेश चव्हाण यांचा समावेश आहे. 

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला शिवाजी सानप काही महिन्यांपासून पुणे येथे वास्तव्याला गेला होता. तेथून बसने पनवेलला यायचा. पनवेलवरून ट्रेनने कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर हजर व्हायचा. १५ ऑगस्टला रात्री साडेदहा वाजता पनवेल रेल्वे स्टेशनवरून मालधक्क्याकडे जात असताना अनोळखी वाहनाने त्याला धडक दिली. गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सानपची पत्नी व मेव्हणा यांनी या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सानपचा अपघात झाला नसून सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले. 

या प्रकरणी सानपबरोबर मुंबई पोलीस दलात काम करणारी शीतल पानसरे व इतर दोन जणांना अटक केली. शीतल व सानप यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते. सानपविरोधात २०१९ मध्ये सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व २०१९ मध्येच विष्णूनगर, ठाणे येथे अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सानपला धडा शिकविण्यासाठी तिने इन्स्टाग्रामवरून मैत्री झालेल्या धनराज जाधव याच्याबरोबर लग्न करून त्यालाही खून करण्याचा आग्रह धरला होता. पण त्याने नकार दिल्यामुळे तिने इतर दोन आरोपींना सुपारी देऊन खून केला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस