शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पनवेलमध्ये शांततेत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:44 IST

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : निषेध फलक झळकावून घोषणाबाजी

कळंबोली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर करून पास करण्यात आला. परंतु कायद्याविरोधाचे देशभरातील वातावरण तापले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लीम समाजाने कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. या वेळी पाच हजारांपेक्षा जास्त मुस्लीम बांधव उपस्थित होते.

तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल शहरातील पटेल, कच्छी मोहल्ला, मुस्लीम नाका, भारतनगर येथील मुस्लिमांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या मैदानावर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेगवेगळे फलक झळकावून कायद्याला विरोध केला.

कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांचा मोर्चा पनवेल महापालिकेजवळ थांबला. त्यामुळे तो तहसील कार्यालयापर्यंत जाऊ शकला नाही. शिष्टमंडळाने जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.

केंद्र शासनाने नागरिकत्वाची जी दुरुस्ती केली आहे ती भारतीयांवर अन्यायकारक आहे. याबाबत अगोदर जनजागृती करणे गरजेचे होते. तसे न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करण्यात आला; याबाबत लोकांना कोणतीही माहिती नाही. तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आम्ही आंदोलन केले.बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणेपनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ बहुजन क्रांती मोर्चातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. शहरातील शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करून बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी कॅब आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा कायदा म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. - लतीफ शेख, अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेसआंदोलनांच्या पार्श्वभूमीवरपोलीस यंत्रणा सज्जनवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना नवी मुंबईतदेखील कायद्याच्या समर्थनार्थ तसेच विरोधात रॅली होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली असून आंदोलकांना शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने होत असून त्यास हिंसक वळण लागत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात १५ हून अधिक राज्यांत अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावर उतरत आहे. त्यानुसार नवी मुंबईतदेखील शनिवारी नेरूळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.