शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 02:17 IST

विभाजनाला नकार : तीन दिवसीय आंदोलनाद्वारे महावितरणला इशारा

नवी मुंबई : महावितरणच्या कर्मचाºयांनी तीन दिवसीय संप पुकारून खासगीकरण व कर्मचारी कपातीला नकार दर्शवला आहे. सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी नवी मुंबईतील महावितरण कार्यालयांच्या कर्मचाºयांनी वाशीत जमून ठिय्या मांडला. त्यामध्ये महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांच्या सहा संघटनांनी सहभाग घेतला आहे.

महावितरणकडून हालचाली सुरू असलेल्या मनुष्यबळ पुनर्रचना व फ्रॅन्चाईजीविरोधात अधिकारी व कर्मचारी यांनी एकजुटीने आवाज उठवला आहे. पुनर्रचनेमुळे मनुष्यबळात कपात होईल याची भीती कर्मचाºयांमध्ये आहे. १ फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्याच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळातील २ मंडळे, भांडुप परिमंडळातील वाशी व ठाणे अशी दोन मंडळे व कल्याण परिमंडळातील कल्याण परिमंडळ अशा पाच मंडळांचा समावेश आहे. महावितरणच्या निर्णयामुळे तिथल्या कर्मचाºयांना बेरोजगारीची चिंता सतावत आहे. यामुळेच फ्रॅन्चाईजी माध्यमातून होणाºया खासगीकरणालाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याकरिता कर्मचाºयांच्या सहा संघटनांच्या कृती समितीच्या वतीने सोमवारपासून तीन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. यानुसार वाशी मंडळातील पनवेल, नेरुळ, ऐरोली, कोपरखैरणे, खारघर, तळोजा आदी ठिकाणच्या महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाºयांनी देखील वाशीत जमून महावितरणच्या निर्णयाविरोधात एकजूट दाखवली. त्यामध्ये वितरण, ट्रान्सपो, जनको कंपनीचे कामगार सहभागी होते. पहिल्या दिवसाचा हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून महावितरणला त्याची दखल घ्यावीच लागणार असल्याची भावना कामगारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. तर वाशी विभागामार्फत होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विभागीय सर्कल उपसचिव शरद मोकल, दत्तात्रेय कांबळे, सुतेज म्हात्रे, सचिन शिंदे व सुनील कासारे आदी प्रयत्न करत आहेत. मात्र संपामुळे महावितरणच्या कामकाजावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट केले आहे.पनवेलमधील ८५ टक्के कामगार संपात सहभागीपनवेलमधील ८५ टक्के महावितरणचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह इतर पाच संघटनांच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला होता. खासगीकरण रद्द करा, सबडिव्हिजन केंद्रांची संख्या कमी करू नये, महापारेषणच्या आकृतिबंध संघटनसोबत चर्चा करून निश्चित करावा, रिक्त जागा भरा, पेन्शन योजना लागू करा अशा मागण्यांसाठी कामगार संपावर गेल्याची माहिती सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई