महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:17 AM2019-01-08T02:17:03+5:302019-01-08T02:17:22+5:30

विभाजनाला नकार : तीन दिवसीय आंदोलनाद्वारे महावितरणला इशारा

Movement of employees of MSEDCL | महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

नवी मुंबई : महावितरणच्या कर्मचाºयांनी तीन दिवसीय संप पुकारून खासगीकरण व कर्मचारी कपातीला नकार दर्शवला आहे. सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी नवी मुंबईतील महावितरण कार्यालयांच्या कर्मचाºयांनी वाशीत जमून ठिय्या मांडला. त्यामध्ये महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व अभियंते यांच्या सहा संघटनांनी सहभाग घेतला आहे.

महावितरणकडून हालचाली सुरू असलेल्या मनुष्यबळ पुनर्रचना व फ्रॅन्चाईजीविरोधात अधिकारी व कर्मचारी यांनी एकजुटीने आवाज उठवला आहे. पुनर्रचनेमुळे मनुष्यबळात कपात होईल याची भीती कर्मचाºयांमध्ये आहे. १ फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्याच्या क्षेत्रात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळातील २ मंडळे, भांडुप परिमंडळातील वाशी व ठाणे अशी दोन मंडळे व कल्याण परिमंडळातील कल्याण परिमंडळ अशा पाच मंडळांचा समावेश आहे. महावितरणच्या निर्णयामुळे तिथल्या कर्मचाºयांना बेरोजगारीची चिंता सतावत आहे. यामुळेच फ्रॅन्चाईजी माध्यमातून होणाºया खासगीकरणालाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याकरिता कर्मचाºयांच्या सहा संघटनांच्या कृती समितीच्या वतीने सोमवारपासून तीन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये राज्यभरातील महावितरणचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. यानुसार वाशी मंडळातील पनवेल, नेरुळ, ऐरोली, कोपरखैरणे, खारघर, तळोजा आदी ठिकाणच्या महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाºयांनी देखील वाशीत जमून महावितरणच्या निर्णयाविरोधात एकजूट दाखवली. त्यामध्ये वितरण, ट्रान्सपो, जनको कंपनीचे कामगार सहभागी होते. पहिल्या दिवसाचा हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून महावितरणला त्याची दखल घ्यावीच लागणार असल्याची भावना कामगारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. तर वाशी विभागामार्फत होणारे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विभागीय सर्कल उपसचिव शरद मोकल, दत्तात्रेय कांबळे, सुतेज म्हात्रे, सचिन शिंदे व सुनील कासारे आदी प्रयत्न करत आहेत. मात्र संपामुळे महावितरणच्या कामकाजावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट केले आहे.

पनवेलमधील ८५ टक्के कामगार संपात सहभागी
पनवेलमधील ८५ टक्के महावितरणचे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह इतर पाच संघटनांच्या माध्यमातून हा संप पुकारण्यात आला होता. खासगीकरण रद्द करा, सबडिव्हिजन केंद्रांची संख्या कमी करू नये, महापारेषणच्या आकृतिबंध संघटनसोबत चर्चा करून निश्चित करावा, रिक्त जागा भरा, पेन्शन योजना लागू करा अशा मागण्यांसाठी कामगार संपावर गेल्याची माहिती सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.
 

Web Title: Movement of employees of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.