शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरच्या कलानगरातून तीन हजारांहून अधिक नागमूर्ती विक्रीसाठी मुंबईकडे रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:36 IST

श्रावणातच येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : नागपंचमी सणाच्या निमित्ताने चिरनेर-उरण कलानगरातुन तीन हजारांहून अधिक नागाच्या मुर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती चिरनेरच्या मुर्तीकार दीपा  गोरे यांनी दिली. श्रावणातच येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीनुसार येथील स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून नागाची मूर्ती   पाटावर ठेवून तिची घरच्याघरी विधीवत  पूजा करतात. ग्रामीण भागातल्या स्त्रिया तर अजूनही शेतावरच्या नागाच्या स्थानावर जाऊन  विधिवत पूजा करतात. यावेळी रानातल्या नागवेलीला महत्व देऊन,  त्या नागवेलीची देखील महिला   पूजा करतात. यावेळी  नारळ, पुष्पहार, दूध, पेढे आणि लाह्या या देवतेला प्रसाद म्हणून अर्पण  करतात. मागील अनेक पिढ्यांची परंपरा जोपासत यावर्षीही  चिरनेर कला नगरीतील  कुंभार समाजाच्या महिला कारागिरांनी तयार केलेल्या हजारो नागमूर्ती मुंबईच्या बाजारात तीन दिवस अगोदरच विक्रीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.  गणेशमूर्ती, नागमूर्ती, मातीची भांडी तयार करण्याचा  कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे. हिंदू संस्कृतीच्या विविध सण उत्सवांमुळे या धंद्यात चार पैसे मिळतात. मात्र मेहनत खूप करावी लागते. दोन महिने आधीपासून आम्ही नागमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतो. लहान  मोठ्या नागमूर्ती या  किरकोळ भावाच्या दराने शंभर ते पन्नास किंवा चाळीस रुपये  या दराने विकल्या जातात. नागपंचमीच्या सणासाठी मुंबईच्या बाजारात येथील नागाच्या मुर्तीना मोठी मागणी असते.दरवर्षी चिरनेरच्या कलानगरातुन तीन हजारांहून अधिक छोट्या- मोठ्या आकाराच्या नागाच्या मुर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती मुर्तीकार दीपा दीपक गोरे यांनी दिली . 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNag Panchamiनागपंचमी