शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:11 IST

वर्षभरात ५९४ किलो गांजा जप्त; पनवेलमधून १४ आरोपी केले गजाआड

नवी मुंबई : गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल परिसरामधील अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. वर्षभरामध्ये तब्बल ५९४ किलो गांजा जप्त केला असून, २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरसही हस्तगत केले आहे. आतापर्यंत १४ आरोपींवर गुन्हे दाखल केले असल्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे.नवी मुंबई, पनवेल, उरण परिसर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी २०१६ मध्ये पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तेव्हापासून गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने धाडसत्र सुरू करून तीन वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त अमली पदार्थ विक्रेत्यांना तुरुंगात पाठविले आहे. नवी मुंबई परिसरामध्ये सर्वाधिक कारवाई झाली होती. एपीएमसी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी व इतर ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेले अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. गांजासह, कोकेन, चरस, एमडी पावडर व इतर अमली पदार्थही हस्तगत केले होते. परिमंडळ एकमध्ये कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे अनेकांनी अवैध व्यवसाय पनवेल परिसरामध्ये सुरू केला होता.रिमंडळ दोनमध्ये अनेक ठिकाणी खुलेआम गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या होत्या. दक्षिणेकडून राज्यांमधून व राज्याच्या इतर भागातून रायगड व इतर ठिकाणी गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीसाठी येऊ लागले होते. यामुळे २०१८ च्या सुरुवातीपासूनच पनवेल परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मार्च महिन्यात सलग दोन दिवस धडक मोहीम राबवून ४७७ किलो गांजा हस्तगत केला होता.खारघरमध्ये २५ डिसेंबरला महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली असताना गांजा आढळून आला होता. यानंतर पनवेल परिसरामधील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. यानंतर गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन महिन्यांमध्ये पनवेल परिसरामध्ये लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईचा धडाका सुरू केला आहे. २२ जानेवारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडूंग फाट्यावर कारवाई करून तब्बल १०८ किलो वजनाचा गांजा व २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. तब्बल ४७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे. कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा बसला आहे.१०० किलो गांजामध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मार्च रोजी पनवेल - मुंब्रा महामार्गावर धाड टाकून एमएच ०२ जेपी ९४३० कारमधून तब्बल १०० किलो गांजा हस्तगत केला होता. अमीर अहमद, सिराज चौधरी व मोहम्मद सिद्धिकी या तिघांना अटक केली होती. त्यांनी आंध्रप्रदेशमधून गांजाविक्रीसाठी पनवेलमध्ये आणला होता.महामार्गावर कारवाईअमली पदार्थ विरोधी पथकाने २२ मार्चला मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून सोलापूर परिसरातून रायगडमध्ये गांजा घेऊन जाणारा टेम्पो व कार ताब्यात घेतली. पोलिसांनी महेश व्हटकर व संताजी खरात यांना अटक करून ५६ लाख रुपये किमतीचा तब्बल ३७७ किलो गांजा हस्तगत केला होता.पनवेल ग्रामीणमध्ये धाडगुन्हे शाखेच्या पथकाने ३० नोव्हेंबरला पनवेल परिसरातील भल्याची वाडी परिसरामध्ये धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. तेथे एका महिलेला अटक केली असून ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNavi Mumbaiनवी मुंबई