शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीचा बोजवारा, नवी मुंबईत तब्बल साडेचार लाख वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 07:28 IST

वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.

-सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहरातील वाहनांच्या संख्येत देखील कमालीची वाढ होत आहे. याचा परिणाम दळणवळण यंत्रणेवर होत आहे. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था असतानाही खासगी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर होत आहे.२१ व्या शतकातले शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबईला वाहतूककोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यावर वेळीच तोडगा न काढल्यास दिल्लीपेक्षा वाईट परिस्थिती नवी मुंबईतल्या रस्त्यांवर उद्भवू शकते. सद्यस्थितीला नवी मुंबई आरटीओकडील आजपर्यंतच्या वाहनांच्या नोंदणीचा आकडा ४ लाख ६० हजारांच्या घरात पोचला आहे. त्यामध्ये डिसेंबर २०१७ पर्यंतच्या नोंदीत २ लाख २३ हजार ६७२ दुचाकी, १ लाख ३५ हजार १९७ कार, १६ हजार ९५० रिक्षा व १४ हजार ४८१ मीटर टॅक्सींचा समावेश आहे. त्यापैकी २२,०३४ दुचाकी व १०,३२२ कारची नोंदणी गतवर्षी झालेली आहे. या वाढत्या वाहनसंख्येमुळे रस्त्यावर जागोजागी वाहतूककोंडी वाढत चालली आहे.राज्याची आर्थिक राजधानी मुंबईतल्या वाढत्या घरांच्या किमतीमुळे वास्तव्यासाठी नवी मुंबईचा पर्याय निवडला जात आहे. यामुळे देशाच्या कानाकोपºयातून आलेल्यांचा लोंढा नवी मुंबईत स्थिरावत आहे. अशातच शहरात उभारी घेत असलेल्या आयटी क्षेत्रामुळे भरघोस पगारांच्या नोकºया उपलब्ध होवून दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांच्याकडून गरज अथवा प्रतिष्ठा म्हणून वाहन खरेदीवर भर दिला जात असल्याने घरटी किमान एक दुचाकी व कार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात नवी मुंबईत दळणवळणासाठी ट्रेन, बेस्ट, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय असतानाही अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर होत आहे. शहरातील सुमारे १५ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ९ लाख लोक प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणाने जवळ, लांबचा प्रवास वाहनाने करतात. तीन लाख प्रवासी एनएमएमटीने तर सुमारे दोन लाख प्रवासी बेस्टने प्रतिदिन प्रवास करतात, तर साधारण दीड लाख प्रवाशांकडून रिक्षाचा पर्याय निवडला जातो. उर्वरित निम्म्याहून अधिक प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर होत असल्याने महत्त्वाच्या मार्गांवर, चौकांमध्ये, सिग्नलच्या ठिकाणी सतत वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे.वाढत्या वाहतूककोंडीमुळे घाईमध्ये अनेक जण वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, वाहतूक पोलिसांवरही ताण वाढत आहे. वाढता वाहतुकीचा हा बोजवारा नियंत्रित करण्यासाठी वाढत चाललेल्या वाढती खासगी वाहनांची संख्या नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याबाबत जनजागृतीचीही आवश्यकता भासत आहे, अन्यथा येत्या काळात वाहतूककोंडीच्या बाबतीत नवी मुंबई दिल्लीला मागे टाकण्याची शक्यता आहे.च्प्रशासनाकडून शहरात स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक वाहनांच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक आहे. यामुळे वाहनांच्या धुरामुळे होणाºया प्रदूषणालाही आळा बसेल. त्याकरिता अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनीही सार्वजनिक वाहनांमधून प्रवासात पुढाकार घेण्याची गरज आहे.च्प्रवाशांच्या सोयीसाठी पालिकेकडून एनएमएमटी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीला एनएमएमटीच्या ताफ्यात ४६५ बस असून वेगवेगळ्या ७५ मार्गांवर त्या चालवल्या जात आहेत. त्यामधून प्रतिदिन सुमारे ३ लाख प्रवासी शहराअंतर्गत अथवा शहराबाहेर प्रवास करतात.च्सार्वजनिक वाहनांऐवजी एकट्या व्यक्तीकडूनही प्रवासासाठी दुचाकी अथवा कारचा अशा खासगी वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या वाढून वाहतूककोंडी होत आहे. भविष्यात ही वाहतूककोंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने खासगी वाहनांच्या वापरावर मर्यादा घालणे काळाची गरज बनले आहे.शहरात एकूण वाहनांची नोंद : 4,56,159

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई