शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

पनवेल महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:40 IST

सात जणांना चावा; महिनाभरातील दुसरी घटना, शहरवासीयांत भीतीचे वातावरण

कळंबोली : भटक्या कुत्र्याने पनवेल शहरातील सुमारे ४० जणांना चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच रविवारी याच शहरातील मालधक्का परिसरात एका भटक्या कुत्र्याने आणखी सात जणांचा चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोकाट कुत्र्यांच्या या दहशतीमुळे पनवेल शहरातील रहिवाशांत कमालीची घबराट पसरली आहे.पनवेल महापालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कुत्र्यांच्या वाढीवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण न राहिल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पनवेलमधील लाइन आळीत एका भटक्या कुत्र्याने तब्बल ४० जाणांना चावा घेतला होता. त्यातील १८ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी पनवेल्या मालधक्का परिसरात एका भटक्या कुत्र्याने पुन्हा सात जणांचा चावा घेतला. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात पनवेलकरांत कमालीचा असंतोष पसरला आहे.शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. अगोदर सिडकोच्या माध्यमातून पोदी येथे निर्बीजीकरण केंद्र चालविले जात होते. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील तब्बल दहा हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने ही सेवा हस्तांतरित केली आहे. तेव्हापासून श्वान निर्बीजीकरण यंत्रणा बंद पडल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या या उदासीनतेचा ताप शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कुत्र्यांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासन आणि त्याअनुषंगाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढली आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीजच्या इंजेक्शनसाठी संबंधितांना उपजिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते.मागील घटनेच्या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन श्वानदंश झालेल्या रुग्णांची चौकशी केली होती. त्यानंतर श्वान नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याचे रविवारच्या घटनेवरून दिसून आले आहे. दरम्यान, रविवारी भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्यात सायली मोहिते, अशोक गुप्ता, शुभम सोनवणे यांच्यासह आणखी चार जणांना श्वानदंश झाला आहे. श्वानदंश झालेल्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नवी मुंबईतही श्वानांचा उपद्रवमोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे पनवेलमधील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांना आवर घालणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालल्याचे लागोपाठ घडलेल्या दोन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. पनवेलसह नवी मुंबईतही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. एरव्ही गळा काढून ओरडणाऱ्या श्वानप्रेमी संघटनांनी आता तरी यासंदर्भात लवचिक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी लवकरच एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मालधक्का परिसरात सात जणांना चावा घेणाºया त्या भटक्या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले आहे.- शैलेश गायकवाड,आरोग्य निरीक्षक, पनवेल महापालिका