शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीवर धडकणार मनसेचे इंजिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 03:52 IST

विकासकामांचा जाब विचारणार : नोकरीत स्थानिकांना डावलले जात असल्याने संताप

उरण : जेएनपीटीच्या अनेक समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी बुधवार, १९ डिसेंबर रोजी मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत, संदीप देशपांडे व सीएचए कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष धुरी आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते जेएनपीटीवर धडकणार आहेत.

मध्यंतरी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे जेएनपीटीत येणार होते, त्यावेळी चेअरमन नीरज बन्सल यांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने ऐनवेळी दौरा रद्द करावा लागला होता. जेएनपीटी प्रकल्पात सुरू असलेल्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. परप्रांतीयांची भरती करून स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात आहे. त्याचबरोबर जेएनपीटी बंदरात सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डीपीडी धोरणामुळे या ठिकाणच्या सुमारे ३५ हजार सीएचए कामगारांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.त्याचबरोबर उरण तालुक्यात मागील दहा ते बारा वर्षांचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी रस्ता अपघातात सुमारे ८५० पेक्षा जास्त तरुण मृत्युमुखी पडले आहेत. यातील बहुतांशी तरु णांचा मृत्यू हा त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने झाला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अद्ययावत रु ग्णालयाची गरज आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला जेएनपीटीच्या प्रशासनाला वेळ नसताना कोणत्याही नागरिकाने मागणी नसताना शिवस्मारकाच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आंदोलनात मनसे सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी केले आहे. 

टॅग्स :MNSमनसे