शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीएच्या चुकीचा फटका बसला ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 07:26 IST

पुलाचा गर्डर तिरका झाल्याने लोकल वाहतूक बंद; हजारो प्रवासी ताटकळले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई/ ठाणे : नवी मुंबई व कल्याण-डाेंबिवलीला जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या ऐरोली-काटई मार्गावरील पुलाचे गर्डर अलाइनमेंट तिरके झाल्याचा फटका शुक्रवारी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल प्रवाशांना बसला. सकाळपासून दुपारी पाऊणपर्यंत लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ठाणे-पनवेल-वाशी लोकल वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे हजारो प्रवासी विविध स्थानकांत अडकून पडले होते.  

   ऐरोली येथे ठाणे-बेलापूर मार्गासह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर हे गर्डर बसविण्यात आले. त्यासाठी गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत  मेगा ब्लॉक घेतला होता. मात्र, काम संपल्यानंतर गर्डर तिरका झाल्याचे लक्षात आले. यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती होती. यामुळे खबरदारी म्हणून ठाणे-पनवेल-वाशी मार्गावरील लोकल वाहतूक बंद ठेवली. अचानक कोणतीही सूचना न देता रेल्वेने हा निर्णय  घेतल्याने सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना काही कळत नव्हते. त्यातच उद्घोषणाही उशिरा केल्याने प्रवाशांच्या  संतापात अधिकच भर पडली.  ठाणे-वाशी-पनवेल लोकलने प्रवास करणाऱ्या नवी मुुंबईतील घणसोली, काेपरखैरणे परिसरात राहणाऱ्या प्रवाशांचेही हाल झाले. 

ऐरोली येथे झालेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत, बदलापूर दिशेच्या प्रवाशांना बसला. त्या मार्गावर लोकल गाड्या सकाळच्या सत्रात अर्धा तास विलंबाने धावल्या. त्यामुळे हजारो प्रवासी ठिकठिकाणी ताटकळले. कल्याण, डोंबिवली स्थानकातही लोकल गाड्यांना विलंब झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांचा खोळंबा झाला. नोकरदारांना लेट मार्कला सामोरे जाण्याची चिंता होती. 

ठाणे-सानपाडा एक सीट ३०० रुपयेठाणे- पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाल्याने त्याचा मनस्ताप येथील प्रवाशांना सहन करावा लागला. याठिकाणी असलेल्या रिक्षाचालकांनी तर प्रवाशांची लूट केली. ठाणे ते सानपाडा प्रत्येक प्रवाशाकडून ३०० ते ४०० रुपये सीट आकारले जात होते. त्यावरून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दुसरीकडे रस्ते मार्गाने जाण्यासाठी ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक १० च्या बाहेर प्रवाशांचा लोंढा आल्याने गर्दीच गर्दी झाली होती. सानपाड्याच्या पुढे जाण्यासाठी ४०० ते ५०० रुपयांची मागणी केली जात होती.

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वे