शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लघुपटांतून युवकांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:28 IST

महापालिकेची स्पर्धा : अनिडस्ट्रॉएबलने पटकाविला प्रथम क्र मांक

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या विविध विषयांवर लघुपट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या लघुपटातून युवकांनी स्वच्छतेचा संदेश दिला. ५२ लघुपटांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अनिडस्ट्रॉएबल या लघुपटाने प्रथम क्र मांक पटकाविला.

महापालिकेच्या लघुपट स्पर्धेत ५२ लघुपटांनी सहभाग नोंदविला. त्यामधील दहा लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. लघुपट स्पर्धेत अनिडस्ट्रॉएबल हा लघुपट प्रथम क्र मांक, भविष्य या लघुपटाने द्वितीय क्र मांक आणि धप्पा या लघुपटाने तृतीय क्र मांकाचे पारितोषिक पटकाविले. स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना मनापासून पटले असून स्वच्छता ही सवय व्हावी, या दृष्टीने स्वच्छतेचा संदेश लघुपटासारख्या मनोरंजक माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उपक्र म ५२ लघुपटांनी सहभागी होत यशस्वी केला असून, याद्वारे युवकांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळत असल्याचा आनंद महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केला. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वच्छता ही प्रत्येकाने करावयाची गोष्ट असून सामूहिक सहभागातूनच यश मिळू शकते, असे सांगत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये पहिल्या सहामाहीच्या सर्वेक्षणात नवी मुंबई देशात तिसऱ्या क्र मांकावर निर्देशित असल्याचे सांगितले. स्वच्छ नवी मुंबई मिशन तदर्थ समितीच्या सभापती नेत्रा शिर्के यांनी, नवी मुंबई शहरातील नागरिकांचा स्वच्छतेसाठी नेहमीच सक्रि य सहभाग असल्याने नवी मुंबई हे नेहमीच स्वच्छतेत अग्रेसर राहिले असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक जयंत पवार यांनी केले. स्पर्धा यशस्वी रीतीने आयोजित करण्यात सहकार्य करणाºया मयूर एज्युकेअर सोसायटी, चेंज युवर लाइफ फाउंडेशन आणि आर. डी. फिल्म्स या संस्थांच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले. या वेळी स्पार्क आणि आॅसम डान्स अ‍ॅकॅडमीच्या बाल कलावंतांनी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. टिकटॉक आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाºया कलाकारांनीही विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाला उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी नगरसेवक मान्यवर, महापालिकेचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवी मुंबईचा रहिवासी होण्याची इच्छाजागो मोहन प्यारे, अस्मिता अशा गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक जयंत पवार यांनी लघुपट स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. नवी मुंबईसारखे मुळातच स्वच्छ शहर असताना येथील युवक लघुपटात काय दाखवतील, याची उत्सुकता असल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यातील इतर शहरांनी नवी मुंबईकडून बोध घ्यावा, असे सांगत नवी मुंबई शहराचा रहिवासी होण्याची इच्छा असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली.