शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील उद्यानामध्ये गर्दुल्ल्यांचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 00:08 IST

दोन मद्यपी जखमी; स्थानिकांकडून कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई : वाशीमधील जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान मद्यपी व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. गांजा ओढणारे व सेवन करणाऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महान देशभक्ताचे नाव असलेल्या उद्यानामध्ये सुरू असलेले हे प्रकार थांबविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाला महानगरपालिकेने जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव दिले आहे. भारताचे १३ वे भूदलप्रमुख असलेल्या वैद्य यांना १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना दुसऱ्यांना महावीर चक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पराक्रमाची आठवण शहरवासीयांना व्हावी, यासाठी उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे; परंतु मागील काही महिन्यांपासून या उद्यानामध्ये मद्यपी व गांजासह इतर अमली पदार्थ ओढणाºया तरुणांचा अड्डा तयार झाला आहे.

दिवसरात्र उद्यानामध्ये तरुण नशा करत बसलेले असतात. त्यामुळे उद्यानाजवळून जाण्यासही नागरिकांना भीती वाटू लागली आहे. हे उद्यान नागरिकांसाठी बंदही करण्यात आले होते. स्थानिक नगरसेवक किशोर पाटकर यांनी मद्यपी व अमली पदार्थ ओढणाºयांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार पोलिसांकडे केली आहे. महापालिकेकडे पाठपुरावा करून येथे सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती केली आहे. यानंतरही गर्दुल्ल्यांचा अड्डा बंद झालेला नाही. कोणी आक्षेप घेतल्यास त्यांना धमकावले जाते व मारहाणही केली जात आहे.उद्यानामध्ये अमली पदार्थ ओढणाºया तरुणांमध्ये नुकतीच हाणामारी झाली. यामध्ये दोन तरुण जखमी असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा प्रकारचा राडा या परिसरामध्ये वारंवार होत असतो.

नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाकडे जाताना उद्यानाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पानटपरीजवळ अमली पदार्थ ओढणारे एकत्र येत असतात. येथेच त्यांना अमली पदार्थ पुरविणारेही येत असतात. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून मारामारीही होत असते. या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळेत येथील अड्डा पूर्णपणे बंद झाला नाही तर भविष्यात एखाद्याचा खून होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याविषयी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याविषयी लवकरच पोलीस आयुक्त संजय कुमार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार आहे.

उपोषणाला बसण्याचा रहिवाशांचा इशारा

वाशी सेक्टर १० मधील उद्यानाजवळील अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचा अड्डा कायमस्वरूपी बंद व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांमधील असंतोष वाढू लागला आहे. वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई