शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून निधी आणणारा होईल महापौर

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून डोक्यावर कर्ज आहे.

भिवंडी :  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून डोक्यावर कर्ज आहे. असे असताना शासनाकडून भिवंडीच्या विकासासाठी जो निधी आणोल तोच मनपाचा महापौर बनेल, असे भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीचे सूत्र बनले आहे. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घातल्याने शिवसेनेचा महापौर बनविण्याचा प्रयत्न स्थानिक पदाधिकारी व नगरसेवक करीत आहेत. यामुळे येत्या 11 डिसेंबर रोजी  होणा:या महापौर व उपमहापौर  निवडणूकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी महानगरपालिकेत एकूण 9क् नगरसेवक असून विरोधी पक्षांत काँग्रेसचे 27 आणि शिवसेनेचे 18 असे एकूण 45 नगरसेवक आहेत. तर सत्ताधारी कोणार्क विकास आघाडीच्या 1क् नगरसेवकांसोबत सपाचे 16,भाजपा 1क्, राकाँपा 9 असे एकूण 45नगरसेवक आहेत. या पक्षीय बलाबलांनुसार सत्ताधारी व विरोधक दोघांकडे समसमान नगरसेवक असताना मतदानाच्या दिवशी हजर राहण्यापेक्षा गैरहजर राहणा:या नगरसेवकाचा भाव वधारला आहे. घोडेबाजार सुरू असला तरी भिवंडीची सध्याची स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून निधी आणणा:याकडे महापौरपद जाणार आहे. पालिकेचे प्रशासन स्थानिक कर वसुलीत निष्क्रीय ठरली आहे. पालिकेच्या खजिन्यात पैसा नसल्याने ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. 
तर काही अधिकारी राजीनामा देत तर काही अमर्याद सुट्टीवर गेले आहेत. त्याचा फटका शहराच्या विकासावर होत आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रमासाठी निधी आणणो अत्यावश्यक आहे. त्यामुळे महापौर व उप महापौर पदाच्या उमेदवारांचा त्यात कस लागणार आहे. (वार्ताहर)