लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलण्यास माथाडी कामगारांनी बुधवारी नकार दिला. परिणामी, सुमारे ३० ट्रकमधील माल उतरू शकला नाही. प्रश्न निकाली काढण्यासाठीच्या बैठकीतही तोडगा न निघाल्याने बाजारातील तणाव अधिकच वाढला.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने नियमाप्रमाणे कृषीमालाच्या गोणीचे वजन कमाल ५० किलो असावे, अशी मागणी लावून धरली आहे. यापूर्वी आंदोलन करूनही प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, बाजारात ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची आवक सुरूच असल्याचा आरोप संघटनेने केला. त्यामुळे १ मार्चपासून जादा वजनाच्या गोण्या न उचलण्याचा इशारा दिला होता. ५० किलोपर्यंत वजन असलेल्या गोण्या उतरवल्या; मात्र जादा वजनाच्या गोण्या हाताळण्यास नकार दिला.
व्यापारावर परिणाम गुरुवारीही जादा वजनाच्या गोण्यांची आवक सुरू राहिल्यास व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
...म्हणून तोडगा नाही बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील तसेच मुकादम उपस्थित होते. संचालक अशोक वाळुंज आदी बैठकीला हजर होते. मात्र, माथाडी संघटना ५० किलो मर्यादेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही.
‘त्या’ गोण्या उचलणार नाही‘कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने ५० किलो हीच कमाल मर्यादा असली पाहिजे. दोन वर्षे पाठपुरावा करूनही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे जादा वजनाच्या गोण्या कोणत्याही परिस्थितीत उचलल्या जाणार नाहीत,’ असे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. ‘देशभरातून येथे माल येतो. कामगारांच्या भूमिकेवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली; मात्र संघटना त्यांच्या निर्णयावर ठाम आहे,’ असे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले.
Web Summary : Mathadi workers refused to handle onion-potato sacks exceeding 50kg, halting market operations. Talks failed to resolve the issue, escalating tensions at the APMC market as union insists on weight limits for worker safety.
Web Summary : मथाडी श्रमिकों ने 50 किलो से अधिक के प्याज-आलू के बोरे उठाने से इनकार कर दिया, जिससे बाजार ठप हो गया। बातचीत से मुद्दे का समाधान नहीं हो सका, जिससे एपीएमसी बाजार में तनाव बढ़ गया क्योंकि संघ श्रमिकों की सुरक्षा के लिए वजन सीमा पर जोर दे रहा है।