शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या चिरनेरमधील ३० कुटुंबांची चांदायली आदिवासीवाडी ७५ वर्षांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 20:47 IST

मधुकर ठाकूर उरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील  चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत आहे.  उरण तालुक्यातील ...

मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील  चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायली कातकरी आदिवासी वाडीत स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची ७५ वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्यापही या वाडीमध्ये आजही रस्ते, पाणी, वीज , शाळा, शौचालय यासारख्या महत्त्वाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने येथील मुलांचे वर्तमान व भविष्य अंधारात आहे.

चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावाच्या हद्दीत  येणारी चांदायली  आदिवासी वाडी ही गेल्या पन्नास साठ वर्षापासून अस्तित्वात आहे. या वाडीत ३० कुटुंबांची लोकवस्ती आहे. मात्र अद्याप या  वाडीवर वीज पुरवठा  झालेला नाही. त्यामुळे येथील आदिवासी बांधव अंधारात जीवन जगत आहेत. त्यांच्या या मागणीकडे अद्यापपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही.विजेचे जाळे सर्वत्र पसरले असतानाही, या  वाडीवर अद्याप विज आलेली नाही. दरम्यान आदिवासींसाठी सरकारने स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत सरकारच्या काही सुविधा पोहोचत  नसल्याचे आश्चर्य वाटते .दरवर्षी अनेकदा मतदान होते.

पुढारी आश्वासने देतात. पण प्रत्यक्षात कृतीत कोणतेही काम येत नसल्यामुळे येथील आदिवासी  राजकीय पुढाऱ्यांवर नाराज आहेत. चिरनेर या इतिहास प्रसिद्ध गावातील आदिवासी  हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्वातंत्र्य रणसंग्रामाच्या लढ्यात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आदीवासी बांधवांचे मोठे योगदान असताना देश स्वतंत्र्य होण्याला ७५ वर्ष उलटून जाऊनही आजही  या आदिवासी वाड्यांपर्यंत विकासाची किरणे पोहोचली  नाहीत. परिणामी येथील आदिवासी बांधव  पारतंत्र्यात जीवन जगत आहेत. सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत .या ठिकाणी विज पुरवठा करण्यासंदर्भात अनेक वेळा मागणी करूनही याकडे कोणीही लक्ष  न  दिल्यामुळे हे आदिवासी बांधव अंधारातच जीवन जगत आहेत. 

चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंबांना वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी चिरनेर येथील  सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी , आदिवासी कार्यकर्ते अमर कातकरी, राजू कातकरी, भरत कातकरी ,यशवंत कातकरी, महेंद्र कातकरी, जयवंत कातकरी, सुधीर कातकरी यांनी उरण वीज महामंडळाचे मुख्य अभियंता विजय सोनवणे यांची  सोमवारी (३) भेट घेऊन निवेदन दिले. 

चांदायली आदिवासी वाडीपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वीजेचे पोलही टाकण्यात आले होते.मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त केले.अधिकाऱ्यावरही दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाईपोटी वीजमंडळाला २० हजार रुपये दंड भरावा लागला.आता मात्र वनविभागाची परवानगी घेऊन काम केले जाणार आहे. परवानगीसाठी वनविभागाला पत्रही पाठविण्यात आले असल्याची माहिती उरण वीजवितरण मंडळाचे उप अभियंता विजय सोनवणे यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबई