शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

झोपड्या, उद्यानांसह मोकळ्या जागांमधून निघतोय गांजाचा धूर, नवी मुंबई पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन

By नामदेव मोरे | Updated: August 16, 2023 20:49 IST

Crime: नवी मुंबई शहरातील अवैध झोपडपट्या, उद्याने, मोकळे भूखंड, इमारतींमधून गांजाचा धूर येऊ लागला आहे. गांजा विक्री करणारे व ओढणारांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई - शहरातील अवैध झोपडपट्या, उद्याने, मोकळे भूखंड, इमारतींमधून गांजाचा धूर येऊ लागला आहे. गांजा विक्री करणारे व ओढणारांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. १५ ऑगस्टला कोम्बींग ऑपरेशन राबवून गांजा ओढणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दारू विक्री करणारांवरही कारवाई केली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांनी पदभार स्विकारल्यापासून शहरातील अवैध व्यवसायांविरोधात मोहीम सुरू केली आहे. आयुक्तालय परिसरातील अवैध झोपडपट्ट्या, बंद पडलेल्या इमारती, उद्याने, मैदाने, मोकळे भूखंड, दाट झाडी असलेल्या परिसरामध्ये गांजा विक्री व ओढणारांचे अड्डे तयार झाले आहेत. सीबीडी, नेरूळ, तुर्भे, एमआयडीसी परिसरामध्ये हे प्रमाण जास्त आहे. या सर्व ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जात असून अमली पदार्थ विक्री करणारांबरोबर ओढणारांवरही कारवाई केली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून व झडती घेऊन गांजा ओढणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले व त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात अवैध दारू विक्रीच्या अड्यांमध्येही वाढ झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दारू विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे अवैध विक्रीच्या अड्यांवरून दारूचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी विविध ठिकाणी छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले असून दारू चा साठाही जप्त केला आहे. यापुढेही अमली पदार्थ व दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

 १५ ऑगस्ट दिवशी गांजा ओढणारांवरील कारवाई पुढील प्रमाणे- नेरूळ सेक्टर २ मधील चिंचोली तलावाजवळून सायंकाळी साडेसहा वाजता अनिकेत तुपे या तरूणाला गांजा ओढताना ताब्यात घेतले.- चिंचोली तलाव परिसरातून याच दरम्यान अविनाश पाटील या तरूणासही गांजा ओढताना ताब्यात घेतले.- उलवे सेक्टर १९ मधून मध्यरात्री दोन वाजता जैनुद्दीन शेख याला गांजा ओढताना ताब्यात घेतले.- दुर्गामाता झोपडपट्टीजवळील तलावाच्या बाजूला गांजा ओढणाऱ्या पंकज शर्मा याला ताब्यात घेतले.- पारसीक हिल टेकडीकडे जाणाऱ्या रोडवर संतोष निषाद गांजा ओढताना ताब्यात घेतले.- राजीव गांधी स्टेडीयमच्या बाजूला सव्वादोन वाजता भरत देवेंद्रन गांजा ओढताना ताब्यात घेतले.

 दारू विक्री करणारांवर केलेली कारवाई- कोपरी गाव सेक्टर २६ मधून भुषण ठोंबरे स्कुटीमधून दारू घेऊन जात असताना रात्री साडेनऊ वाजता ताब्यात घेतले.- श्रमीकनगर अवैध दारू विक्री करणाऱ्या शंकर राठोडवर गुन्हा.- नेरूळ एलपी ब्रीजजवळ रशिद शेख शिरवणे सेक्टर १ दारू विक्री करत असताना अटक केली.- सीबीडी सेक्टर १० मेट्रो पुलाच्या खाली अवैध दारू विक्री करणाऱ्या रविंद्र वानखेडेवर गुन्हा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई