शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आरक्षणाचा लढा जिंकून वाजत-गाजत-नाचत मराठा समाज परतला

By नारायण जाधव | Updated: January 28, 2024 07:41 IST

Maratha Reservation: आठवडाभरापूर्वी समाजबांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेल्या जरांगे-पाटील यांनी कोणत्याही आमिषाला भीक न घालता आणि राजसत्तेचा दबाव येऊ न देता मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्याच ताेंडून आरक्षणाची अधिसूचना वदवून मराठा आरक्षणाचा अवघड किल्ला लढवून आपला लढा जिंकला आहे.

- नारायण जाधवनवी मुुंबई  -  सहा महिन्यांपूर्वी त्यांना जालन्याच्या अंतरवाली सराटी गावाशिवाय कोणी ओळखत नव्हते. मात्र, तुमची मागणी  नि:स्वार्थी आणि हेतू स्पष्ट असेल तर समाज तुमच्या मागे उभा राहतो. तुमचे दिसणे वा तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, हे मराठा आंदोलनाचे राज्यातील एकमेव नेते म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे-पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आठवडाभरापूर्वी समाजबांधवांना घेऊन मुंबईकडे निघालेल्या जरांगे-पाटील यांनी कोणत्याही आमिषाला भीक न घालता आणि राजसत्तेचा दबाव येऊ न देता मुख्यमंत्र्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्याच ताेंडून आरक्षणाची अधिसूचना वदवून मराठा आरक्षणाचा अवघड किल्ला लढवून आपला लढा जिंकला आहे. यामुळे राज्यातील मराठा समाजाचे ते हिरो झाले. आरक्षणासाठी लक्ष लागून राहिलेल्या राज्यभरातील मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर त्यांनी आनंद फुलवला. 

मनोज जरांगे-पाटील यांनी ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आता माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. समाजासाठी मरण आलं तरी बेहत्तर’ असे सांगून आठवड्यापूर्वी जालन्यातून राजधानी मुंबईकडे कूच केले होते. या वाटेत त्यांना समाजबांधवांसह इतर समाजाचा, धर्मियांचा जो प्रतिसाद मिळत होता, तो पाहता या खेपेला मराठा समाजाच्या  आरक्षणाबाबत राज्यातील  महायुती सरकारला काहीतरी करणे भाग पडेल, पण नक्की काय पदरात पडेल, हे कोणाला सांगता येत  नव्हते. परंतु, एकमेव मनोज जरांगे सांगत होते, या खेपेला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेलच. ते त्यांनी खरे करून दाखवले. या लढ्यात त्यांनी सरकारकडून हाेणाऱ्या वाटाघाटींसाठी टिकणारे आरक्षण मिळावे, सरकारी कागदपत्रांत काही दगाफटका होऊ नये, यासाठी तज्ज्ञांची टीमही सोबत घेतली होती. सरकारकडून आलेली प्रत्येकी बोलणी, वाटाघाटींसाठी त्यांनी याच टीमचा  सल्ला  घेतला. 

बाजार समितीत  ४७ वर्षांत प्रथमच शेतकऱ्यांची छावणीनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून ४७ वर्षांत प्रथमच मार्केटमध्ये लाखो शेतकऱ्यांची छावणी पडली. आंदोलनानिमित्त राज्यातील शेतकरी मार्केटमध्ये दाखल झाले.  मराठा आरक्षण आंदोलनात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या काेनाकोपऱ्यातील शेतकरी सहभागी झाला होता. सर्वांच्या राहण्याची व्यवस्था बाजार समितीमध्ये करण्यात आली होती. ७० हेक्टर जमिनीवर आंदोलकांचा तळ पडला होता. बाजार समिती ही शेतकऱ्यांचीच संस्था. यामुळे आपल्याच संस्थेमध्ये मुक्कामाला आल्याची भावना आंदोलकांनी बोलून दाखविली. १५ ऑगस्ट १९४७ ला मुंबई बाजार समितीची स्थापना झाली. सुरुवातीला मुंबईमध्ये व १९८१ नंतर टप्प्याटप्प्याने सर्व मार्केट नवी मुंबईत स्थलांतर झाली. संस्थेचे नाव कृषी उत्पन्न बाजार समिती असले तरी प्रत्यक्षात येथे स्वत: शेतकरी येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. आतापर्यंत येथे माथाडी कामगारांचे व इतर मेळावे झाले पण शेतकऱ्यांचा भव्य मेळावा कधीच झाला नव्हता.४७ वर्षांत प्रथमच बाजार समितीमध्ये एकाच वेळी लाखो शेतकरी एकत्र आले होते. मुंबई बाजार समितीने या सर्वांसाठी राहण्याची सोय, पाणी, शौचालय, जेवण व इतर सुविधा पुरविल्या. बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, अधिकारी कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी एवढे शेतकरी आल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबई