शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत मराठ्यांचा गर्दीचा विक्रम; दोन किलोमीटरचा रांगा

By नामदेव मोरे | Updated: January 26, 2024 13:45 IST

चौकाच्या चारही बाजूला भगवे वादळ : अंतर्गत रस्त्यांवर चक्काजाम

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आरक्षणासाठीच्या आंदोलनातील निर्यायक सभा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होत आहे. सभेला अभुतपुर्व गर्दी जमली आहे. सभेपासून तुर्भे रोडवर दोन किलोमीटरची रांग लागली होती. रेल्वे स्टेशन व कोपरखैरणे रोडवरही भगवे वादळ निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी नवी मुंबईचा आसमंत दुमदुमला होता.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे पहाटेपासून आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. हजारो नागरिक बाजार समितीमध्ये शासनाच्या शिष्टमंडळाबरोबर काय चर्चा होणार हे ऐकण्यासाठी मार्केटमध्ये थांबले होते. शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना वाशीतील सभेच्या ठिकाणी येण्याचे आवाहन केले. परंतु वाशी ते कोपरखैरणे रोडवर प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांना पायी जाणेही शक्य होत नव्हते. वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते वाशी प्लाझा, कोपरखैरणे रोड व अरेंजा सर्कलपर्यंत चारही बाजूला भगवे ध्वज हातात घेतलेल्या आंदोलकांनी प्रचंड गर्दी केली होती.

नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये प्रथमच एवढी मोठी सभा होत होती. या परिसरातील वाहतूक व्यवस्था इतर मार्गाने वळविण्यात आली होती. सभा दोन वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतरही सभेच्या ठिकाणी गर्दी हटत नव्हती. हजारो नागरिकांनी टेंम्पो, ट्रक, ट्रॅक्टरमध्ये राेडवर थांबूनच सभा ऐकण्याचा निर्णय घेतला होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील