शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:20 IST

मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. तब्बल ९० संघटनांनी त्यांची निवेदने दिली असून, समाजाला लवकर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये मराठा संघटनांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, तज्ज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रायगड व नवी मुंबई परिसरासाठी जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच कोकण भवन परिसरामध्ये मराठा समाजाच्या संघटना व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी कोकणभवनसमोर उपस्थिती दर्शविली होती. पाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन यावेळी आयोगाला देण्यात आले. मराठा समाजामधील माथाडी कामगार व इतर कष्टकरी नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये पुरेसे उत्पादन होत नाही. यामुळे समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळावा अशी विनंतीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे रायगडमधील संघटक विनोद साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवेदने सादर केली आहेत. मराठा स्वराज्य संस्था, खारघर मराठा समाज, मराठा अस्तित्व प्रतिष्ठान यांच्यासह तब्बल ९० संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. जवळपास पाच हजार नागरिकांनी वैयक्तिक निवेदने सादर केली आहेत.कोकण भवन परिसर मराठामय झाला होता. सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीसाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच टोकन नंबर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयातून नागरिक सुनावणीसाठी येत होते. सर्वांनी लेखी निवेदने सादर केली आहेत. निवेदन सादर करण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी गैरसोय होऊ नये व गोंधळ होऊ नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी सर्वांना सहकार्य करत होते. स्वयंसेवकांमुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख, शिवाजीराव बर्गे, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीमधील विनोद साबळे, अंकुश कदम, मोहन पाडळे, अ‍ॅड. राहुल पवार, मयूर धुमाळ, अभिजित भोसले, सूरज बडदे, राहुल गावडे, नीलेश मोडवे, अनिल गायकवाड, जनार्दन मोरे उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत सुनावणी पार पडली.>मोर्चाची आठवणकोकण भवनमध्ये मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी होती. या वेळी ९० पेक्षा जास्त संघटना व ५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी निवेदने सादर केली आहेत. सुनावणीसाठी रायगड व नवी मुंबईमधून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे आले होते. यामुळे सर्वांना २१ सप्टेंबरच्या मूक मोर्चाची आठवण झाली. रायगड व नवी मुंबईमधील ७ लाख नागरिकांनी शांतपणे कोकणभवनवर मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती.>कडक बंदोबस्तसुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर व इमारतीमध्येही पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना पोलीसही योग्य सहकार्य करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी योग्य नियोजन केल्यामुळे सुनावणी शिस्तबद्धपणे पार पडली.>मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाल्यास माथाडी कामगार व इतर कष्टकरी मराठा नागरिकांना त्याचा लाभ होईल. आयोगासमोर समाजाच्या स्थितीविषयी व आरक्षण का मिळावे याविषयी भूमिका आम्ही मांडली आहे.- नरेंद्र पाटील, माथाडी नेतेआरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने यापूर्वी मोर्चे काढले आहेत. समाजाच्या भावना आयोगासमोर मांडल्या आहेत. आता लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून समाजाला न्याय मिळावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.- विनोद साबळे,मराठा क्रांती मोर्चा