शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात केले तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:38 IST

कोविडबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालात सुमारे ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

वैभव गायकरपनवेल : कोरोनाकाळात भीतीपोटी माणूस माणसाच्या जवळ उभा राहत नव्हता. मात्र अशा परिस्थितीतही शेकडो मृतदेहांचे शवविच्छेदन करणारे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे काम काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले आहे. 

कोविडबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालात सुमारे ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात न्यायवैद्यक शास्त्रतज्ज्ञ डॉ. बी. एम. काळेल यांनी ही यशस्वी कामगिरी केली. विशेष म्हणजे कोविडला सुरुवात झाल्यापासून आजतागायत डॉ. काळेल आणि त्यांची संपूर्ण टीम मृतदेहांचे शवविच्छेदन करत आहे.

कोविड काळात कामगिरी  बजावल्याने अनेक डॉक्टर आरोग्यसेवेतील घटकांना कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. त्यांचे योगदान त्यासाठी होतेच मात्र माणसांच्या संपर्कात येऊन मृतदेहांच्या संपर्कात येणे व त्यांचे शवविच्छेदन करणे हेही काम अतिशय जिकरीचे होते. एक नव्हे तर तब्बल ७९९ मृतदेहांचे शवविच्छेदन करणारे पनवेलमधील डॉक्टर काही प्रमाणात दुर्लक्षितच राहिले आहेत.मार्च २०२० पासून पनवेल उपजिल्हा आजतागायत डॉ. काळेल व त्यांची टीम आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. 

या डॉक्टरांना आजवर सन्मानित करण्यात आले नसले तरी आपले कर्तव्य बजावताना हे डॉक्टर एक पाऊलदेखील मागे हटलेले नाहीत. ७९९ मृतदेहांमध्ये ६० मृतदेह कोरोनासदृश होते. डॉ. काळेल यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, शवचिकित्सा सहायक जयेश देशमुख, एम. सदाप आदींचा समावेश आहे.

या शवविच्छेदनामध्ये आत्महत्या, अपघात, आकस्मित निधन, गळफास, पाण्यात बुडालेले, ताप तसेच इतर आजारांनी मृत्युमुखी पावलेल्या मृतदेहांचा समावेश आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला कोविडमध्ये जिल्हा कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता.  यावेळी अधीक्षक म्हणून डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांच्या बदलीनंतर डॉ. बी. एस. लोहारे यांनी आम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन केले असल्याचे डॉ. काळेल यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई