शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

कारखानदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:58 IST

जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत

प्रशांत शेडगे,  पनवेलजलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत तीन-तीन दिवस पाणी येत नसल्याने उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था करावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. याबाबत त्वरित बैठक लावून उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.एकूण ९०७ हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली असून, या ठिकाणी आजमितीला ८२३ छोटे-मोठे कारखाने आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कारखाने आणि औद्योगिक उलाढाल होत असताना येथे काही प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचा सूर उमटत होता. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीवर पाणीटंचाईचे अस्मानी संकट ओढावले आहे. बारवी व शहाड या दोन पाणीपुरवठा केंद्रातून तळोजा एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ३८ एमएलडी पाणी रोज दिले जाते. पाणीसाठा कमी असल्याने जलसंपदा विभागाने पाणीबचतीचे निर्देश एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने सगळ्या कारखानदारांना ३0 टक्के पाणीकपात तीन महिन्यांपूर्वीच सुरू केली आहे. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस पाणीकपात करण्यात येते. जलशुध्दीकरण केंद्रातून आठवड्यातून ४८ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र शनिवारी सुध्दा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन दिवस एमआयडीसीतील कारखान्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गुरुवार, शुक्र वार आणि शनिवारी एमआयडीसीचा घशा कोरडा पडत आहे. या ठिकाणच्या बहुतांशी कारखान्यांना पाण्याची आवश्यकता असून तेच मिळत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे टीएमसीच्या सचिव जयश्री काटकर यांनी सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांना केली होती. त्यानुसार आ. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचे अध्यक्ष संदीप डोंगरे, सचिव जयश्री काटकर, श्याम कारकून, दिलीप परूळेकर, स्वाती वाबळे, परेश देशपांडे, श्रीपाद लेले, मनोहर बोरसे, एम.जी.गोखले, यशवंत ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काही महिन्यापूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीटंचाईवर मात्रा म्हणून गळती कमी करण्याची घोषणा केली होती. मात्र गळती अद्याप कमी झाली नसल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूस देण्यात आले. ७५ तासांचा शटडाऊन घेतल्यामुळे कारखान्यादारांना मोठा फटका बसत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नेरूळ येथील सीईडीपी प्लँटमधून तळोजा एमआयडीसीला पाणी दिले तर पाणीटंचाई दूर होईल, हा उपायही मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सुचविण्यात आला. तळोजातील टंचाई तातडीने दूर करण्याकरिता संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यामुळे कारखानदारांना दिलासा मिळाला.