शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:01 IST

जगभरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी स्वस्तातील हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

नवी मुंबई : जगभरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी स्वस्तातील हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पर्यंत १५ जणांची सुमारे १४ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण देश-विदेशात पर्यटनासाठी जातात. मात्र, अनेकांना आर्थिक परिस्थितीवरून जगभ्रमंतीचा मोह आवरता घ्यावा लागतो. याच संधीचा फायदा घेऊन त्यांना स्वस्तात जगभ्रमंतीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या राज्यभर सक्रिय आहेत. त्यांच्याकडून आलिशान इमारतीमध्ये कार्यालय थाटून त्या ठिकाणी सेमिनारच्या नावाखाली अनेकांना बोलवून पर्यटनाची भुरळ घातली जात आहे. अशाच प्रकारातून १५ जणांना १३ लाख ७१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सीबीडी बेलापूर येथे घडला आहे. या प्रकरणी १५ जणांच्या तक्रारीवरून सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व तक्रारदारांना फोन अथवा मॅसेज करून सेक्टर १५ येथील एनएमएस टिटानियम इमारतीच्या आठव्या मजल्यावरील सेमिस्टर ग्लोबल कंपनीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. त्यांना वेगवेगळी हॉलिडे पॅकेजची माहिती देऊन ते खरेदी केल्यास ३० वर्षांत जगभरात मोफत सात ते दहा दिवस राहायला मिळणार असल्याचे सांगितले होते.यावरून सर्व तक्रारदारांनी ८० हजार रुपये ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज खरेदी केले होते. त्याची रक्कम अदा केल्यानंतर कंपनीकडून फोन येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आठवडाभर वाट पाहूनही कंपनीतर्फे कोणीच संपर्क न साधल्याने त्यांनी सीबीडी येथील कार्यालयाकडे धाव घेतली असता, त्या ठिकाणी कोणीच नव्हते, यामुळे सेमिस्टर ग्लोबल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार मॅनेजर विक्रांत मनदास व इतर कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>सेमिस्टर ग्लोबल सर्व्हिसेस कपंनीचे मॅनेजर विक्रांत मनदास व इतर कर्मचाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची नावेही बनावट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही वाशी व सानपाडा, पनवेल परिसरात अशी कार्यालये थाटून हॉलिडे पॅकेजच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातल्याचे प्रकार घडलेले आहेत, त्यानंतरही शहरात असे प्रकार सुरूच आहेत.