शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री!

By कमलाकर कांबळे | Updated: May 11, 2024 20:00 IST

भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात गणेश नाईकांनी केले म्हस्के यांच्या विजयाचे आवाहन

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. देशाचा विकास हे मोदींचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्ततेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना विक्रमी मताधिक्क्याने निवडून द्या, असे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी शनिवारी केले. नवी मुंबई भाजपा जिल्हा कमिटीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केसुद्धा उपस्थित होते. गणेश नाईक यांच्या नेतृत्वामुळे सुनियोजित नवी मुंबई शहर घडल्याचा गौरव नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात केला. ते मोठ्या मनाचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविताना मला विजयाची खात्री वाटते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीची प्रस्तावना नवी मुंबई, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली. २०१९ पासून नवी मुंबईमध्ये भाजप संघटन अधिक मजबूत झाले. २०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाल्याचे जिल्हाध्यक्ष नाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नरेश म्हस्के यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी महापौर तथा ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक, आमदार रवींद्र फाटक, भाजप माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा नेते वैभव नाईक, बेलापूर विधानसभा निवडणूक प्रमुख नीलेश म्हात्रे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षा भोसले यांच्यासह नवी मुंबई भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४naresh mhaskeनरेश म्हस्केGanesh Naikगणेश नाईकthane-pcठाणे