शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019 : नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 05:58 IST

मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही.

नवी मुंबई : ऐरोलीसहबेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्या काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे. नेते रस्त्यावर; कार्यकर्ते सोशल मीडियावरनवी मुंबई : ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेºया काढण्यास सुरुवात केली आहे. पावसामध्येही नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत; परंतु या रॅलींमध्ये कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये व्यस्त असून प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले असल्यामुळे काही उमेदवारांनीही समाजमाध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे.मतदानासाठी फक्त दहा दिवस शिल्लक असून अद्याप नवी मुंबईमध्ये प्रचाराला वेग आलेला नाही. ऐरोली मतदारसंघामध्ये तब्बल चार लाख ६१ हजार मतदार असून, बेलापूरमध्ये तीन लाख ८५ हजार मतदार आहेत. पुढील दहा दिवसांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान सर्वच उमेदवारांपर्यंत आहे. नोकरी-व्यवसायासाठी बहुतांश नागरिक दिवसभर बाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळता मतदार घरी मिळणे अशक्य आहे. यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांना पसंती देण्यात येत आहे. भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस व अपक्ष उमेदवारांनीही समाजमाध्यमांवरून माहिती पाठविण्यासाठी स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. नेमक्या शब्दात प्रचाराचे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यापेक्षा व्हिडीओ पाहण्याला नागरिकांची पसंती असल्याने उमेदवाराच्या कार्याची माहिती देणारे व्हिडीओ तयार केले आहेत. छायाचित्रांचे स्लाइडशो तयार करून तेही प्रसारित केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसह सर्व माध्यमांचा उपयोग करण्यास सुरुवात केली आहे.प्रमुख उमेदवारांनी रॅली व विविध समाजाच्या गटांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. पावसामधूनही प्रचार सुरू आहे. उमेदवार घरोघरी जात असताना कार्यकर्ते मात्र समाजमाध्यमांमधून बाहेर येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाºयांच्या कार्यालयांमध्ये अद्याप गर्दी दिसत नाही. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासही सुरुवात झालेली नाही. मतदारांचा जाहीरनामाही घरोघरी पोहोचलेला नाही. निवडणुका आहेत की नाही, असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांपर्यंत न पोहोचल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरही बसण्याची शक्यता आहे. यामुळे कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांबरोबर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत; परंतु अद्याप एकही प्रभागामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून रॅली व चौकसभा घेण्यात आलेल्या नसल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढू लागली आहे.खर्च कोणी करायचाअद्याप प्रत्येक प्रभागामध्ये रॅली व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात नाही. प्रत्यक्ष भेटीऐवजी समाजमाध्यमातूनच संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. याविषयी काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता सुट्टी वगळता प्रत्यक्ष घरी नागरिक भेटत नाहीत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागते. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, तो कोणी करायचा? असा प्रश्न असल्यामुळे समाजमाध्यमातून विनाखर्चाचा प्रचार होत असल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.समाजमाध्यमांवरही भांडणेनिवडणुका सुरू झाल्या की, अनेक वेळा दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन त्यांच्यामध्ये राडा झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रत्यक्षातील राड्याऐवजी समाजमाध्यमांवरील ग्रुपवरच कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जाऊ लागले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी भाजपमध्ये गेले असल्यामुळे ते भाजपचे कौतुक करून राष्ट्रवादीवर टीका करत असल्यामुळे त्यांना या पूर्वीच्या मेसेजची आठवण करून दिली जात आहे.पोहोचण्यासाठी सुलभ मार्गप्रचारासाठी खूप कमी दिवस राहिले आहेत. प्रत्यक्ष सर्व मतदारांना भेटणे शक्य नाही. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा प्रभावी उपयोग केला जात आहे. प्रत्यक्ष पत्रके वाटण्याऐवजी समाजमाध्यमातून ते लवकर व कमी खर्चात पाठविता येत असल्याने समाजमाध्यमांचा वापर जास्त केला जात असल्याची प्रतिक्रिया नेरुळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव पवार यांनी दिली. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पत्रकेही वाटण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रचार साहित्य पोहोचले नाहीऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप अनेक उमेदवारांची पत्रके व जाहीरनामे तयार झालेले नाहीत. प्रभागांमध्ये रॅली काढण्यासाठी झेंडे, टोपी व इतर प्रचार साहित्यही अद्याप बहुतांश विभागामध्ये पोहोचलेले नाही. निवडणूक विभागाचेही खर्चावर बारीक लक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष रॅलीपेक्षा समाजमाध्यमांना पसंती दिली जात असल्याचे काही कार्यकर्त्यांनी नावन सांगण्याच्या अटीवर सांगितले.

 

टॅग्स :airoli-acऐरोलीbelapur-acबेलापूर