शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Election 2019: वर्चस्वासाठी चुरशीची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 23:47 IST

जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे.

उरण : जेएनपीटी, ओएनजीसी, बीपीसीएल, करंजा मच्छीमार बंदर, येथील रासायनिक प्रकल्प, होऊ घातलेला शिवडी-न्हावा सी-लिंक आणि नवी मुंबई विमानतळ तसेच खालापूर, रसायनीमधील विविध प्रकल्पांमुळे उरण मतदारसंघात औद्योगिक पसारा वाढतच आहे. भविष्यात औद्योगिक राजधानी म्हणून उदयास येणाऱ्या या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार लढाई सुरू आहे.

उरण मतदारसंघात यंदा सेना-भाजप महायुतीचे विद्यमान उमेदवार मनोहर भोईर, काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्यातच लढत होत आहे. मात्र, प्रचारादरम्यान क्षणाक्षणाला विजयाचे पारडे या तीनही प्रमुख उमेदवारांच्या अवतीभवती फिरत आहे.

परस्परांविरोधात दररोजच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. जातीपातीच्या राजकारणात प्रचाराची पातळी खालावत चालली आहे. याशिवाय परिसरातील समस्या, वाहतूककोंडी सोडविण्याचा दावा सर्वच पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. आता मतदार कुणाला कौल देतात, हे निवडणुकीनंतरच कळेल.

जमेच्या बाजूप्रशासकीय कामांचा गाढा अभ्यास. खर्डे वक्ते , २० वर्षे आमदार राहिलेल्या आणि सत्ता नसतानाही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्नाळा स्पोटर््सच्या माध्यमातून देशपातळीवरील खेळाडू घडविले आहेत. जेएनपीटी, सिडको, ओएनजीसी, महामुंबई सेझ, नोकर भरती आदी प्रकल्पग्रस्तांच्या विविध आंदोलने, मोर्चा, संघर्षात आघाडीवर राहिले आहेत. केंद्र सरकारच्या डीपीडी धोरणाविरोधात लढे उभारून कामगारांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न केले आहेत.उरण विधानसभा मतदारसंघात सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार मनोहर भोईर हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाच वर्षांत मतदारसंघातील काही समस्या मार्गी लावल्या. नौदलाच्या आरक्षित सेफ्टीझोनचा प्रश्न सुटला नसला तरी केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले आहे. भोईर यांनी बांधबंदिस्तीसाठी निधी उपलब्ध करून २५०० एकर जमीन नापीक होण्यापासून वाचविली. हुतात्मा स्मारकांच्या सुशोभीकरण, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला.नगरसेवक, नगराध्यक्ष, जेएनपीटी ट्रस्टी ते भाजपचे जिल्हाध्यक्ष असा राजकीय प्रवास केलेल्या बालदींना प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे. भाजपमध्ये असताना सात उड्डाणपूल, ६-८ लेन रस्ते, जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप, करंजा मच्छीमार बंदरासाठी १५० कोटींचा निधी, जेएनपीटीच्या माध्यमातून बांधण्यात आलेले शिवसमर्थ स्मारक, घारापुरी बेटावर कायमस्वरूपी वीजपुरवठा आदीबाबत पाठपुरावा केल्याचा दावा बालदींनी केला आहे.

उणे बाजू

शैक्षणिक क्षेत्रात फारसे काम नाही. शेकडो शेतकºयांची हजारो हेक्टर जमीन नापीक झाली, यावर तातडीची उपाययोजना करण्यात अपयशी. बेरोजगारी, जेएनपीटी, सिडको प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडवाटपाचा प्रश्न अधांतरीच आहे. उरण मतदारसंघात आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यात तसेच मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात अपयश. २०१४ च्या पराभवानंतर अनेक निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्ते दुरावले.मनोहर भोईर यांना विकासकामांऐवजी ठेकेदारीच्या कामातच अधिक रस असल्याचे बोलले जाते. जेएनपीटी-बेलापूर दरम्यान दररोज होणाºया वाहतूककोंडीवर पाच वर्षांत अद्यापही तोडगा निघाला नाही. औद्योगिकीकरण झपाट्याने होत असतानाही बेरोजगारांची संख्या वाढतच आहे. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उरणमध्ये सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. जेएनपीटी साडेबारा टक्के विकसित भूखंडवाटपाचा प्रश्नही ३० वर्षांपासून अद्यापही प्रलंबित आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून पराभूत झाले. महायुतीमधून सेनेला उरणची जागा मिळाली. त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्याने पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उरणच्या विकासासाठी पाच हजार कोटींचा निधी आणण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. मात्र, अपक्ष उमेदवार इतका निधी कसा आणि कुठून आणणार याचीच चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. पाच वर्षांत नागरिकांनी केलेल्या आंदोलनात सहभाग नाही.

टॅग्स :uran-acउरणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019