शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

हत्येचा प्रयत्न करणाऱ्यास मध्य प्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:21 AM

विहीघर येथे एकाच बांधकाम साइटवर काम करणा-या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

पनवेल : विहीघर येथे एकाच बांधकाम साइटवर काम करणा-या व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. सत्येंद्र रामधर चौधरी (२५, अहिरगाव, मध्य प्रदेश) या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील विहीघर येथे मरी आई मंदिराच्या पाठीमागे एका बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू आहे. या ठिकाणी कमलेशकुमार रामेश्वर कोरी (२७, मध्य प्रदेश) व सत्येंद्र रामधर चौधरी हे काम करत आहेत. त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून आधी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात ठेवून सत्येंद्र याने कमलेशकुमार याच्या डोक्यावर लाकडी बांबूने मारहाण केली.कमलेशकुमार जखमी झाल्यानंतर सत्येंद्र तेथून पळून गेला. खांदेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्येंद्र मध्यप्रदेश येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एच जुईकर, पोलीस हवालदार जयंत यादव, पोलीस नाईक प्रफुल्ल कुकले यांनी मध्यप्रदेश गाठले. आदिवासी भाग असल्याने आरोपीला पकडणे कठीण काम होते. म्हणून खांदेश्वर पोलिसांनी तेथील ठाणा सिव्हिल लाइन सतना (मध्यप्रदेश) स्थानिक पोलिसांची मदत घेतली. व सत्येंद्र रामधर चौधरी याला रात्री अटक केली.कमलेशकुमार याच्यावर एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचार सुरू असून बेशुद्धावस्थेत आहे. तो शुध्दीत येण्याची पोलीस वाट पहात आहेत. या प्रकरणी सत्येंद्रला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.