शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
2
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
3
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
4
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
5
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
6
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
7
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
8
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
9
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
10
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
11
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
12
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
13
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
14
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
15
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
16
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
17
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
18
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
19
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
20
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये कमळ सत्तेत

By admin | Updated: May 27, 2017 02:25 IST

महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये एकहाती यश मिळवून भाजपाने इतिहास घडविला आहे. बहुमताची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये एकहाती यश मिळवून भाजपाने इतिहास घडविला आहे. बहुमताची खात्री पटताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतशबाजी करून विजयोत्सव साजरा केला. दुसरीकडे शेकाप आघाडी व शिवसेनेला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही निराशा स्पष्टपणे दिसू लागली होती. महापालिकेवर सत्ता कोणाची, याविषयी सर्वच राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पहाटेपासून सहाही मतमोजणी केंद्रांबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मतमोजणी सुरू होताच भारतीय जनता पक्षाने आघाडी घेण्यास सुरुवात केली. भाजपाबरोबर शेकाप आघाडीनेही विजयाचे खाते उघडल्याने दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला होता. पक्षाचे झेंडे फडकावून व फटाके वाजवून आनंद साजरा केला जात होता; परंतु पहिल्या एक तासानंतर भाजपाचा आकडा वाढत गेला व शेकाप आघाडीला हक्काच्या प्रभागांमध्येही अपयश येऊ लागले. यामुळे आघाडीचा उत्साह मावळत गेला. शेकापचे हक्काचे उमेदवार, पराभव झालेल्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी घरी जाण्यास सुरुवात केली. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. दुपारी २ वाजल्यानंतर भाजपाने बहुमतावर शिक्कामोर्तब केल्याने सर्वच मतमोजणी केंद्रे भाजपामय झाली होती. विजयाचे शिल्पकार माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेऊन जल्लोष केला. परेश ठाकूरही विक्रमी मतांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळविता आले नाही. महाआघाडीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. सर्वाधिक नाचक्की शिवसेनेची झाली. भाजपाने दिलेल्या २० जागा ठुकारावून स्वबळाचा नारा पक्षश्रेष्ठींनी दिला. उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊनही पक्षाला खातेही उघडला न आल्याने शिवसैनिकांनी दुपारी १ नंतरच मतमोजणी केंद्राबाहेरून काढता पाय घेतला. पनवेल महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता आल्याने, महापौर भाजपाचाच होणार! हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती प्रवर्ग महिला जागेसाठी हे पद राखीव असल्याने भाजपाच्या गोटातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विजयी महिला उमेदवारांना लॉटरी लागली आहे. पनवेल महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार? याचे गणित महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे सोपे झाले होते. मात्र, भाजपाकडून उमेदवार असलेल्या अनुसूचित जातीच्या चार उमेदवार निवडून आल्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून डॉ. कविता चौतमल, विद्या गायकवाड, संतोषी तुपे, आरती नवघरे या चार उमेदवार विजयी झाल्या आहेत. मात्र, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत राहिलेले किशोर चौतमल यांच्या पत्नी सुशिक्षित असून, डॉ. कविता चौतमल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडेल, अशी शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीही त्यांचेच नाव चर्चेत होते.विकासाचे रोल मॉडेल घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो. जनतेने आम्हाला कौल दिला आहे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण राबविण्यासाठी आम्ही पनवेलमध्ये प्रयत्न करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पनवेलचा विकास करणार आहोत. पनवेलचा विकास करण्यासाठी शेकापची सत्ता मोडीत काढणे गरजेचे होते, जनतेने ते केले आहे. पनवेल स्मार्ट सिटी करण्यास आमदार प्रशांत ठाकूर नक्कीच प्रयत्न करतील. - रामशेठ ठाकूर, माजी खासदारभाजपाने भ्रष्टाचारी, अनैतिक धंदे चालविणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली. ही माहिती आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवूनही मतदारांनी अशा उमेदवारांना निवडून दिले, हे आमच्यासाठी धक्कादायक आहे. यासंदर्भात नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत, तसेच कामोठे, खारघरसारख्या शहरात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असताना, या ठिकाणी शेकापला जनता नाकारू शकत नाही. ईव्हीएम मशिन घोटाळा झाल्याचा आमचा दावा आहे. खारघरमध्ये याकरिता लेखी तक्र ारही दिली असून आम्ही निवडणूक आयोगासह, न्यायालयात यासंदर्भात दाद मागणार आहोत. - विवेक पाटील, माजी आमदार, शेकाप विधानसभेच्या तुलनेत या निवडणुक ीत सेनेचे मताधिक्य वाढले आहे. आमचे कार्यकर्ते जनतेचे नगरसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत. आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलो ही आमची सुरु वात आहे. पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.- आदेश बांदेकर, सचिव, शिवसेना भाजपाचा विजय हा संशयास्पद आहे. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकांना सामोरे गेलो होतो. ईव्हीएम मशिन घोटाळ्यासंदर्भात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आमचादेखील याबाबत आक्षेप असून, या संदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे. - आमदार बाळाराम पाटील, शेकाप