शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

खार जमीन संशोधन केंद्रात लाखोंचे नुकसान; पाच हेक्टरवरील भात रोपांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:01 IST

गोदामातील ८ टन खत भिजले; विविध प्रजातीचे २ टन मासेही गेले वाहून

- वैभव गायकरपनवेल : रायगड जिल्ह्यात पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्राला रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमिनीवर संशोधन करणारे हे एकमेव संशोधन केंद्र आहे. अतिवृष्टीमुळे केंद्रातील भाताची रोपं, विविध प्रजातीची मत्सबीजे, विक्री योग्य मासे आदींसह कागदपत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आकडा २० लाखांच्या घरात गेला आहे.गेल्या दोन दिवसांत पनवेल तालुक्यात साधारण ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने तालुक्यातील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ग्रामीण भागासह पनवेल शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गाढी नदी किनारी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.शहरातील बंदर रोडवर असलेल्या खार जमीन संशोधन केंद्रातही पाणी साचल्याने संशोधन केंद्राचे मोठे नुकसान झाले. यामध्ये ५ हेक्टर परिसरातील भाताची रोपे वाहून गेली, तसेच या ठिकाणी तयार करण्यात येणारे युरिया(डीएपी) हे गोदामात साठविलेले ८ टन खतदेखील पाण्यात भिजले आहे. त्यामुळे सुमारे २ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती येथील खार जमीन शास्त्रज्ञांनी दिली. या व्यतिरिक्त केंद्रातील महत्त्वाचे रेकॉर्ड असलेले कागदपत्रे भिजली आहेत.संशोधन केंद्रात मत्सबीजांवर प्रक्रिया करून विक्री केली जाते. खार जमीन संशोधन केंद्रातील सुमारे दहा लाखांची मत्सबीजे वाहून गेली आहेत, तसेच रोहा, कटला, थीलापिया, जिताडा या वेगवेगळ्या प्रजातीचे विक्रीयोग्य दोन टन मासेदेखील वाहून गेल्याची माहिती खार जमीन शास्त्रज्ञ डॉ एस. बी. धोडके यांनी दिली. पाणीउपसा करणारा पंपही पाण्याखाली गेल्याने केंद्रात साचलेले पाणी काढण्यात अडथळा निर्माण झाला होता.पनवेलमध्ये १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर, १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण ‘खार जमीन संशोधन केंद्र’ असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रांमध्ये विभागण्यात आले आहे. मात्र, पारगाव येथील जमीन विमानतळासाठी संपादित झाल्याने खार जमीन क्षेत्राची जागा कमी होत आहे. विशेष म्हणजे, २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेदेखील केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या केंद्राचे लाखोंचे नुकसान झाले आहे.खार जमीन संशोधन केंद्रात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पनवेल तहसीलदारांना पत्र लिहिले आहे, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठालादेखील या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.- डॉ. एस. बी. धोडके, खार जमीन शास्त्रज्ञ.केंद्राला पुराचा धोकागाढी नदीचे पाणी पनवेल खाडीत जाते, त्या किनाऱ्यालगत खार जमीन संशोधन केंद्र आहे. विमानतळाच्या भरावामुळे नैसर्गिक पाणी साठणारे ठिकाण संकुचित झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे भविष्यात संशोधन केंद्राला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.