ठाणो :50 हजारांची वीमा पॉलीसी काढल्यास कंपनीकडून पाच ते 20 लाखांचे कर्ज आधी देतो अशी बतावणी करून नंतर या कर्ज मंजूरीच्या प्रक्रियेसाठी 76 हजार 9क्क् ची रक्कम घेऊन रिलायन्स आणि एबी कॅपिटलच्या नऊ जणांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी रिलायन्सकडून तक्रारदाराचे पॉलिसीचे पैसे परत मिळवून दिले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्यापही कोणाला अटक केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कशीश पार्कमधील निळकंठ हौसिंग सोसायटीतील बेस्टचे कामगार चंद्रकांत मोहिते यांना राजीव मल्होत्र यांच्यासह नऊ जणांच्या टोळक्याने रिलायन्स ए. बी. कॅपिटल लि. कंपनीकडून निरनिराळया स्वरुपाचे कर्ज वितरीत केले जात असल्याचे सांगितले. नंतर 5क् हजारांची पॉलीसी घेतल्यास कंपनीकडून पाच ते 2क् लाखांचे गृहकर्ज शून्य व्याजदरावर मिळू शकते, असेही आमिष दाखविले. त्यांनी पाच लाखांच्या कर्जाला होकार दर्शविताच कर्जाच्या प्रक्रीयेच्या नावाखाली त्यांच्याकडून 76 हजार 9क्क् रुपये घेण्यात आले.मात्र, त्यांनी कर्जही मंजूर केले नाही आणि त्याच्या नावाखाली घेतलेली रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहितेंनी रिलायन्स इंन्शुअरन्स आणि एबी कॅपीटलचे कर्मचारी आदित्य बलराज यांच्यासह नऊ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
असे मिळाले 5क् हजार रुपये
4मोहितेंनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर वागळे इस्टेट पोलिसांनी रिलायन्स आणि एबी कॅपीटल एजन्सीला संपर्क साधून एजन्सीचे प्रतिनिधी ग्राहकांना नको असलेल्या विमा पॉलीसी कशा प्रकारे देतात, याची माहिती दिली. शिवाय, त्यांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि कंपनीचे या प्रतिनिधींवर नियंत्रण राहिले नसल्याचे निदर्शनास आणून देताच रिलायन्सने मोहितेंना पॉलीसीचे 5क् हजार रुपये परत केले. आता लोन प्रोसेगिंगची रक्कम वसूली करण्यासाठी या टोळीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक मदन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
4रिलायन्सने पॉलीसी विकणारी एबी कॅपिटल ही एजन्सी नेमली आहे. या एजन्सीच्या प्रतिनिधींकडूनच ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून पैसे उकळणारे रिलायन्सच्या किंवा एबीच्या किती जणांचा यात समावेश आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.
4ग्राहकांनी आपल्या क्रेडीट कार्ड आणि मोबाईलची माहिती कोणालाही देऊ नये. तसेच सव्र्हे चालू आहे, त्यात तुमचे सीलेक्शन झाले असून तुम्हाला कर्ज देण्यात येणार आहे. किंवा बक्षिस देण्यात येणार आहे, अशा फोनद्वारे येणा:या अमिषाला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.