शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उत्साहात रंगला ‘लोकमत’ आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:49 IST

पुरस्काराच्या माध्यमातून नवी मुंबईतील ४५ शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील विविध शाळांमधील उल्लेखनीय नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यासाठी विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत’ आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, १३ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. या पुरस्काराच्या माध्यमातून नवी मुंबईतील ४५ शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी भावे सभागृह तुडूंब भरले होते.भावी पिढीला घडविण्याचे काम करणाºया शिक्षकांच्या कार्याचा सन्मान तसेच शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. नवी मुंबई शहरातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात पहिल्यांदाच या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सुमारे ४५ शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. शाळांच्या कमिटीशी संपर्क साधून शाळांच्या कमिटीने सुचविलेल्या शिक्षकांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शाळांमधील आवडत्या शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्र माची सुरुवात करण्यात आली. त्यांनतर शाळांमधील विद्यार्थ्यांचे डान्स आणि पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी प्रस्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू विशद केला. या वेळी विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक विजय नाहटा, कार्याध्यक्ष विठ्ठल मोरे, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. मोहंती, व्ही टू सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक राज जी. ठक्कर, रौनक अ‍ॅडव्हर्टायझिंगचे संचालक अमरदीप सिंग व्हिग, अभिनेता विजय पाटकर, अभिनेता जयवंत वाडकर, एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार, वेलनेस अ‍ॅण्ड कॉर्पोरेटच्या ट्रेनर रिचा भार्गव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.सविस्तर छायाचित्रे उद्याच्या अंकात

टॅग्स :Teacherशिक्षकNavi Mumbaiनवी मुंबई