शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कोकणातील तीन हजार उद्योजकांना कर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:26 IST

Navi Mumbai: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. कोकण विभागातील सुमारे १६ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

 नवी मुंबई - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. कोकण विभागातील सुमारे १६ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या योजनेंतर्गत चालू वर्षात कोकण विभागासाठी ४,६०० प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यात जिल्हा उद्योग केंद्रांना २,७६०, तर खादी व  ग्रामोद्योग विभागाला १,८४० प्रकरणांचा समावेश होता. कोकण विभागाने एकूण ३,२७३ कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत.  यामध्ये ६१  कोटी अनुदान रकमेचा समावेश आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांच्या  जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला दिलेले  उद्दिष्ट सलग दुसऱ्यांदा पूर्ण केले. 

रोजगारनिर्मितीला मोठी चालना मंजूर प्रकरणांमध्ये १ हजार ८ घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून, २,२६५ घटक हे सेवा क्षेत्रातील आहे. यामध्ये ५० टक्के महिला व मागासवर्गीय उद्योग घटकांचासमावेश आहे. वरील कर्ज प्रकरणांमधून सुमारे १६ हजारांहून अधिक  रोजगारनिर्मिती होणार आहे. विभागातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक  विजू सिरसाठ यांनी व्यक्त केला आहे. विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागाने ही कामगिरी केली.

टॅग्स :businessव्यवसायMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार