शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी आज सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 02:53 IST

सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया होणार आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील ११०० शिल्लक घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. त्सिडको भवनच्या सातव्या मजल्यावरील सभागृहात सोडत प्रक्रिया होणार आहे.सिडकोने आॅगस्ट २०१८ मध्ये १५ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढली होती. परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ११०० घरांची विक्री झाली नाही. या शिल्लक घरांत ७३ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, तर उर्वरित १०२७ सदनिका अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका केवळ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्यांसाठी आहेत.या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. अर्ज सादर करण्याच्या ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६०,००० ग्राहकांनी घरांसाठी अर्ज केले होते. मागील १५ दिवसांत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आली, त्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत निघणार आहे.उपलब्ध घरांचा तपशीलतळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये १४,८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प उभारला जात आहे. संगणकीय सोडतीनंतर ११०० घरे शिल्लक आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे ३९ तर द्रोणागिरी येथे ३४ घरे आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ६५०, खारघर ५९, कळंबोली ५३, घणसोली ४३ व द्रोणागिरी येथे २२२ घरे आहेत.

टॅग्स :cidcoसिडको