शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पनवेलमध्ये महानगरच्या गॅसवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:09 IST

अनर्थ टळला : परिसरातील गॅसपुरवठा खंडित; नागरिकांची गैरसोय

पनवेल : शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीत भूमिगत गटाराचे खोदकाम सुरू असताना रविवारी सकाळी महानगरची गॅसवाहिनी फुटली. त्यामुळे अर्धा तास वायुगळती झाली. मात्र, गळती त्वरित नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला. मिडलक्लास हौसिंग सोसायटी परिसरात महिन्याभरापासून महापालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार बांधण्याचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. रविवारीदेखील अशाच प्रकारे भूखंड क्र मांक ८४ जवळील स्वामी समर्थ इमारतीसमोर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. सकाळी ९ च्या सुमारास खोदकाम करताना एका ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गॅसचे फवारे वर निघू लागले.

परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास ही बाब येताच, त्यांनी अग्निशमन दल व महानगर गॅस कॉर्पोरेशनला कळवले. सुमारे ३० मिनिटांनी या गळतीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारीही या वेळी घटनास्थळी दाखल झाले होते. गॅसगळतीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. महानगर गॅसमध्ये नैसर्गिक वायू असल्याने तो ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यास आगीचा भडका उडण्याची शक्यता असते. येथील रहिवासी संजय दलाल यांनी गॅसगळतीची बाब अग्निशमन व महानगर गॅस प्रशासनाच्या निदर्शन आणून दिली. गॅसगळती थांबविण्यासाठी परिसरातील सर्व गॅसपुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच परिसरातील मार्गही काही काळ बंद ठेवण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गॅसपुरवठा खंडित केल्याने अनेकांची गैरसोय झाली.समन्वयाचा अभावपनवेलमध्ये ज्या परिसरात भूमिगत गटारांसाठी खोदकाम सुरू होते, त्या ठिकाणी महानगर गॅसलाइन गेल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरीदेखील पालिकेने याबाबत महानगर गॅस व्यवस्थापनाशी समन्वय न साधता थेट कामाला सुरु वात केली. समन्वयाअभावी ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.गॅसगळती झालेल्या ठिकाणी महानगर गॅसची टीम दाखल झाली आहे. परिसरातील गॅसपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला आहे. हे काम करताना महापालिकेने कोणताही समन्वय साधलेला नाही. गॅसवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होताच गॅसपुरवठा सुरळीत होईल.- संदीप सिंग लोहिया,महानगर गॅस, एमर्जन्सी कंट्रोल रूम

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई