शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये आवरे-पनवेल एसटी अपघातात २१ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 05:06 IST

आवरे-पनवेल एसटीला गव्हाणफाट्याजवळ मंगळवारी अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

उरण : आवरे-पनवेल एसटीला गव्हाणफाट्याजवळ मंगळवारी अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे समजताच, इतर वाहनांतील प्रवाशांनी बसमधील जखमींना बाहेर काढले आणि ताबडतोब कळंबोलीतील एमजीएम आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. कळंबोली येथील रुग्णालयात १७ तर पनवेल येथे चार जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. या बसमधून कॉलेजचे विद्यार्थी आणि रुग्णालयात उपचारासाठी जाणारे प्रवासी जास्त संख्येने होते.

आवरे गावातून ही बस (एमएच-२० बीएल-०९९७३) पनवेल आगाराकडे निघाली होती. बसमध्ये ४५ प्रवासी होते. गव्हाणफाट्याच्या पुढे उतरणीवर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस एका आंब्याच्या झाडाला धडकली. धडकेमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या तोंडाला, डोक्याला जबर मार बसला. बसमधील २१ प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम आणि पनवेल येथे दाखल करण्यात आले होते. काही प्रवाशांना खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. एमजीएम कळंबोली रुग्णालयात शीतल गोंधळी (१८), मनीषा घोलप (६०), प्रशांत म्हात्रे (४०), साक्षी रेवसकर (१६), रितेश कांबळे (१९), सोनम कांबळे (२२), जयवंत म्हात्रे (६७), अनसूया म्हात्रे (६५), प्रवीण म्हात्रे (४१), रघुनाथ नागावकर(६०), कमलाकर कोळी (६६), दत्तात्रेय डाकी (५८), राजाराम पाटील (५४), उषा म्हात्रे (५९), सुधीर म्हात्रे (३४), स्वानंद नवाळे (२८) यांना दाखल करण्यात आले आहे.बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे चालक एस.एम. कोलाटे यांचे म्हणणे आहे. मात्र, पनवेल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. एसटी महामंडळाकडून जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आल्याची माहिती स्थानक प्रमुख डी. के. म्हात्रे यांनी दिली. तसेच ज्या प्रवाशांना जास्त खर्च आला असेल त्यांना देखील नंतर मदत देण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात