मुंबई : नवीन लर्निग लायसन्स देताना जनतेची फसवणूक होऊ नये आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी अंधेरी आरटीओने नवीन लर्निग लायसन्स देण्याकरिता ऑनलाइन अपॉइंटमेंट सुरू केली. मात्र आता जुन्या कन्सल्टन्सींचा कोटा पूर्ण झाला असून नवीन कन्सल्टन्सी नेमण्यात आल्याने 12 डिसेंबरनंतरच नवीन लर्निग लायसन्स देण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
ऑनलाइन लर्निग लायसन्सचे कामकाज ओरियंट कन्सल्टन्सीच्या 666.ेंँं31ंल्ल2ूे.्रल्ल या संकेतस्थळावरून जनतेसाठी उपलब्ध करून दिले होते. मात्र 14 सप्टेंबरपासून ऑनलाइन अपॉइंटमेंट देण्यासाठी शासनाने मान्य केलेल्या आणि नवीन कन्सल्टन्सी एनआयसीने विकसित केलेल्या 666.2ं1ं3ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावरून ऑनलाइन अपॉइंटमेंटचे कामकाज सुरू करावे, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने आदेश दिलेले आहेत. 14 नोव्हेंबर्पयत ओरियंट कन्सल्टन्सीच्या 666.ेंँं31ंल्ल2ूे.्रल्ल या संकेतस्थळावर 12 डिसेंबर्पयतच्या अपॉइंटमेंट घेतलेल्या आहेत. हे पाहता 13 डिसेंबरपासून पुढील तारखेसाठी 666.2ं1ं3ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर अपॉइंटमेंट मिळवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे 12 डिसेंबर्पयत कोणत्याही संकेतस्थळावर लर्निग लायसन्ससाठी अपॉइंटमेंट मिळणार नाहीत. अपॉइंटमेंटचा कोटा पूर्ण झाल्यानेच हा निर्णय झाल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
च्जुन्या कन्सल्टन्सीचा कोटा पूर्ण झाला असून नवीन कल्सल्टन्सी नेमण्यात आल्याने 12 डिसेंबरनंतरच नवीन लर्निग लायसन्स देण्यात येणार आहे.