शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनंतर पुन्हा शिकल्या; ५०व्या वर्षी ‘एमए’ झाल्या, तेजस्विनी महाडिक यांचे यश

By नामदेव मोरे | Updated: May 23, 2024 18:38 IST

तीन दशकांच्या खंडानंतर पुन्हा शिक्षणास सुरुवात

नवी मुंबई : शिक्षणाला वयाची अट नसते हे सिवूडमधील ५० वर्षांच्या तेजस्विनी महाडिक यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा शिक्षण सुरू करून त्यांनी मराठी विषयात एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिवूड येथे राहणाऱ्या तेजस्विनी महाडिक यांनी १९९४ मध्ये बी.कॉमची पदवी मिळविली. पुढे कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण थांबले. कॉमर्समध्ये पदवी मिळविली असली तरी त्यांना मराठी साहित्याची आवड होती. पती रवींद्र महाडिक यांच्यासोबत सिवूड रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत होत्या. मराठीमध्ये पुढील शिक्षण घ्यावे, अशी ओढ मनात होती. 

परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वर्षा भोसले यांच्याशी चर्चा करताना मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. करणे शक्य असल्याचे समजले. यानंतर मुंबईतील के.जी. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकताच एम.ए.चा निकाल लागला असून, तेजस्विनी या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर मिळालेल्या पदवीविषयी कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. शिवाय सिवूडमधील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षणास वयाची अट नसते. मनात इच्छा असेल तर खंडित झालेले शिक्षण कधीही पूर्ण करता येते हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले असून, यामुळे अनेकांना शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून नागरिकांनीही व्यक्त केल्या आहेत. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणामध्ये अनेक वर्षांचा खंड पडला होता. मराठी विषयाची आवड होती. यामुळे त्यामध्येच पुढील शिक्षण घ्यावे असे ठरविले. ३० वर्षांनंतर पदव्युत्तर पदवी मिळविता आली याचा विशेष आनंद आहे. - तेजस्विनी महाडिक, सिवूड

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण